शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वित्तीय कंपनीच्या फसवणुकीला पोलिस जबाबदार, सत्तेतील बड्या नेत्यांचे नाव सांगून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:29 IST

सावंतवाडी : वित्तीय कंपनीच्या फसवणुकीविरोधात आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे दिलेले असतानासुद्धा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट ...

सावंतवाडी : वित्तीय कंपनीच्या फसवणुकीविरोधात आम्ही तक्रारी तसेच आवश्यक पुरावे दिलेले असतानासुद्धा सावंतवाडी पोलिसांनी कोणतीही दखल न घेता उलट त्या कंपनीला क्लीन चिट दिली. त्यामुळेच अनेकांची फसवणूक झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.तसेच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्तेतील मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन पैसे जमा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी पुंडलिक दळवी, अॅड. सायली दुभाषी, सावली पाटकर, हिदयतुला खान आदी उपस्थित होते.

सावंतवाडीत एका एंटरप्रायझेसच्या नावाखाली वित्तीय कंपनीचे कार्यालय थाटून अनेकांची फसवणूक करणारी कंपनी पळून गेली आहे. या पार्श्वभूमीवर घारे यांनी पोलिस यंत्रणेला जबाबदार ठरवले आहे. वित्तीय संस्थेचे दुकान थाटलेल्या कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रथमच त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून रोखण्यात आले होते. तसेच या कंपनीची चौकशी करा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती.मात्र, पोलिसांनी कोणतीही भूमिका न घेतल्यामुळेच पुढील ग्राहकांची फसवणूक झाली. केवळ पोलिसांनी क्लीन चिट दिल्याने हा आर्थिक कट करणे साध्य झाले. त्यामुळे याप्रकरणी सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी न्यायालयात करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भोसले म्हणाले, या ठिकाणी चुकीची पद्धत वापरून तसेच आमिष दाखवून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांची व दिव्यांगांची फसवणूक केली आहे. झालेला प्रकार योग्य नाही. याबाबत आम्ही नक्कीच दाद मागणार आहोत, काही झाले तरी ग्राहकांची फसवणूक होणार नाही, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहणार आहे.तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणारयावेळी दळवी म्हणाले, प्रथमच हा प्रकार लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीने पोलिसांकरवी त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला होता. मात्र, काहींनी त्या ठिकाणी आम्हाला कर्ज मिळते, त्यामुुळे विरोध करू नका, अशी भूमिका मांडली. त्यामुळे काही अंशी आम्ही गप्प राहिलो, अन्यथा हा प्रकार झालाच नसता. तरीही आता गप्प बसणार नाही. संबधित ग्राहकांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfraudधोकेबाजीPoliceपोलिस