वैभववाडीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
By Admin | Updated: August 17, 2016 23:57 IST2016-08-17T23:38:37+5:302016-08-17T23:57:53+5:30
तावडे पिता-पुत्राचा धिंगाणा : आरामबसवर दगडफेक

वैभववाडीत पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की
वैभववाडी, कणकवली : जानवली (ता. कणकवली) येथे खासगी आरामबसवर दगडफेक करून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कळसुलीतील तावडे पिता-पुत्रांना करूळ तपासणी नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वैभववाडी पोलिस ठाण्यात आणल्यावर या पिता-पुत्रांनी धिंगाणा घालून पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करीत निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये शिक्षक परिषदेचे नेते सुधाकर बाबाजी तावडे व त्यांचा चिरंजीव डॉ. सुजित सुधाकर तावडे (रा. कळसुली, कणकवली) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ९.१० च्या सुमारास जानवलीनजीक आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बोरिवली ते गोवा जाणाऱ्या
सुधाकर तावडे
शिक्षक परिषदेचे नेते
कळसुली येथील तावडे पिता-पुत्राने पाठलाग करून जानवली पुलानजीक आरामबस अडवून दगडफेक केली. त्याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर त्यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात धिंगाणा घालून उपनिरीक्षकांना धक्काबुक्की केल्याने दिवसभरात दुसरा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांतील संशयित आरोपी सुधाकर बाबाजी तावडे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या माध्यमिक शिक्षकांच्या संघटनेचे नेते आहेत, तर त्यांचा चिरंजीव सुजित व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यामुळे उच्चविद्याविभूषितांकडून घडलेल्या कृत्याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.