पोलीस स्वप्ना, सोनीच्या मार्गावर
By Admin | Updated: June 3, 2014 02:04 IST2014-06-03T01:41:58+5:302014-06-03T02:04:48+5:30
मसुरकर ज्वेलर्स चोरी प्रकरण

पोलीस स्वप्ना, सोनीच्या मार्गावर
सावंतवाडी : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मसूरकर ज्वेलर्समधील चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेले कावेरी पोफळघट व उमेश परदेशी हे तपासकामात पोलिसांना साथ देत नसल्याने पोलिसांसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणातील स्वप्ना व सोनी यांच्या मार्गावर असून हे दोघेही पोलिसांना हुलकावणी देत आहेत. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या नितीन पोपळघाट याची सुटका झाल्यानंतर कावेरी पोफळघट व उमेश परदेशी या दोघांना नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. पण, तपासकामात ही दोघेही पुढील कोणतीच माहिती देत नसून पोलिसांना चकवा देत आहेत. मी चोरी केलीच नसून, मी अशीच आले होते. माझा या चोरीशी काहीही संबंध नाही, असे कावेरीने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलीस आता स्वप्ना व सोनी या दोघांच्या मार्गावर आहेत. यातील सोनी हिने मसूरकर यांच्या दुकानातील वस्तूवर डल्ला मारला होता. पण ती अल्पवयीन असल्याने पोलिसांसमोरचा पेच वाढला आहे. दरम्यान, या प्रकरणात दरदिवशी नवनवीन माहिती पुढे येत असल्याने गुंता अधिकाधिक वाढत आहे. (प्रतिनिधी)