शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

शेर्ले विवाहिता अत्याचारातील तिघांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 22:53 IST

शेर्ले येथील विवाहितेला ब्लॅकमेल करून व धमकी देऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाºया निखिल आरोसकर, साईनाथ धुरी व गौरेश केरकर या तिघांना सावंतवाडी न्यायालयाने ३० सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मंगळवारी सकाळी निखिल आरोसकर व साईनाथ धुरी यांना तर रात्रौ उशिरा गौरेश लक्ष्मण केरकर याला बांदा पोलिसांनी अटक केली होती.

 सिंधुदुर्ग - शेर्ले येथील विवाहितेला ब्लॅकमेल करून व धमकी देऊन तिच्यावर अतिप्रसंग करणा-या निखिल आरोसकर, साईनाथ धुरी व गौरेश केरकर या तिघांना सावंतवाडी न्यायालयाने ३० सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मंगळवारी सकाळी निखिल आरोसकर व साईनाथ धुरी यांना तर रात्रौ उशिरा गौरेश लक्ष्मण केरकर याला बांदा पोलिसांनी अटक केली होती.शेर्ले येथील विवाहित महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधून तिच्या नवºयाच्या मित्रांनीच अत्याचार केल्याची तक्रार मंगळवारी त्या पीडित महिलेने बांदा पोलिसात दिली होती. जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत या तिघांनी या महिलेला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या ठिकाणी नेत अतिप्रसंग केला होता. अखेर मानसिक त्रास असह्य झाल्याने मंगळवारी तिने या तिघांविरोधात बांदा पोलिसांत तक्रार दिली.बांदा पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत साईनाथ धुरी व निखिल आरोसकर या दोघांना गावातून तत्काळ अटक केली. तर कामानिमित्त बाहेर गेलेला गौरेश लक्ष्मण केरकर हा रात्रौ उशीरा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली. या तिघांना बांदा पोलिसांनी बुधवारी दुपारी सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयाने ३० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान बुधवारी सकाळी बांदा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीजन्य पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे या परिसरात तीव्र संताापाची लाट उसळली असून या दोषींना कडक शासन व्हावे, अशीच प्रतिक्रिया उमटत आहेत. अत्याचार प्रकरणात बांदा पोलीस संशयितांनी वापरलेले कपडे, गाडी लवकरच ताब्यात घेणार आहेत. तसेच याप्रकरणी काही साक्षीदारही तपासण्यात येत आहेत.सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी बुधवारी बांदा पोलीस स्थानकाला भेट देत तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेत सूचना दिल्या. पत्रकारांशी बोलताना गवस यांनी हा प्रकार म्हणजे विकृतीचा आहे. समाजासाठी असल्या प्रवृत्ती घातक आहेत. यासाठी समाजानेही जागृत राहून अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन केले. संशयिताची  गर्लफ्रेंड  बांदा पोलीस स्थानकात...या अत्याचार प्रकरणातील एका संशयिताची मैत्रीण हे प्रकरण समजताच थेट बांदा पोलिस ठाण्यात दाखल झाली. एवढेच नव्हे तर तिने पीडित महिलेच्या पतीशी  तू-तू मै-मै  करीत वाद घालण्यास सुरुवात केली. तुमच्याकडे पुरावा आहे का? त्यानेच हे कृत्य केले कशावरून? असे सवाल तिने करताच त्या महिलेच्या नणंद असलेल्या युवतीने तुला आमच्याशी बोलण्याचा कोणताही संबंध नसून पुरावे आहेत किंवा नाहीत ते पोलीस व न्यायालयात दिसेल, असे सांगताच मात्र ती गप्प झाली. मात्र सायंकाळपर्यंत ती प्रेमिका पोलीस स्थानकातच असल्याने त्याची एक वेगळीच चर्चा रंगत होती. आईचा आक्रोश...या प्रकरणातील एक संशयित युवकाची आई त्याच्या अटकेनंतर त्याला भेटायला आली होती. त्या युवकाची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. पोलीस स्थानकातत येताच त्या मातेचे डोळे अश्रूंनी डबडबले. ह्यह्या काय केलंय रे बाळा' असा म्हणत तिने आक्रोश केला. तर काही वेळाने तुझी औषधे पाठवून देऊ ना? असे विचारल्याने उपस्थितही गहिवरले.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस