जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात
By Admin | Updated: May 16, 2014 00:23 IST2014-05-16T00:22:24+5:302014-05-16T00:23:05+5:30
सिंधुदुर्गनगरी : महिनाभर प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुुरुवात होईल

जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात
सिंधुदुर्गनगरी : महिनाभर प्रतीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी लागणार आहे. त्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुुरुवात होईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातून पोलीस पथकाने संचलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक जे.डी. मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, उपनिरीक्षक मुल्ला, भोईर, श्रीमती देशमुख आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी येथे अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात १६ मे रोजी होणार आहे. या मतदारसंघातील १0 उमेदवारांचे भवितव्य या दिवशी ठरणार आहे. मात्र, खरी लढत काँग्रेसचे नीलेश राणे आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यामध्येच रंगणार आहे. गेले महिनाभर चाललेल्या चर्चेच्या गुराळाला आता पूर्णविराम मिळणार आहे. मात्र, कधी नव्हे इतक्या शांततेत पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल काय लागणार? कोण बाजी मारणार? या चिंतेत आजची रात्र अनेकांची झोप बिघडवणारी ठरणार आहे. उद्या शुक्रवारी मतमोजणी असल्याने आजपासूनच राजकीय मंडळी रत्नागिरीकडे रवाना झाली आहे. तर शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)