संदीप बोडवेमालवण (जि. सिंधुदुर्ग) : भारतातील प्रमुख असलेल्या आणि महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला दिशा दाखविणाऱ्या शासनाच्या स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण केंद्राला (इसदा) तोट्यात दाखवून ते खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. इसदाच्या खासगीकरणामुळे स्थानिकांना तगडा प्रतिस्पर्धी निर्माण होणार असून स्थानिकांचे जल पर्यटन व्यवसाय संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.स्थानिकांमध्ये स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देणे, त्यांच्यात कौशल्यवृद्धी करणे यासाठी शासनाने तारकर्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग ॲण्ड ॲक्वाटिक स्पोर्टस् अर्थात इसदाची उभारणी केली. या प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीनंतर मालवण परिसरात पाचशेहून अधिक स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांनी रोजगार निर्मितीला सुरुवात केली आहे, तर अडीच ते तीन हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत इसदाने भारतीय वायूसेनेच्या हजारो वैमानिकांना तसेच वनविभाग आणि स्थानिकांना प्रशिक्षण दिले आहे.स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकजूट दाखविण्याची वेळदोन वर्षांपूर्वी तारकर्ली येथील इसदाच्या डागडुजीसाठी साडेतीन कोटी मंजूर झाले होते. मात्र, हे काम अद्याप रडतखडत चालू आहे. यामुळे जाणूनबुजून इसदाला तोट्यात ढकलण्याचा मोठा डाव आखला गेला आहे की काय, असा संशय निर्माण होऊ लागला आहे. इसदाला मुद्दामहून नुकसानीत दाखवून खासगीकरणासाठी घाट घातला जात असेल तर स्थानिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यटन व्यावसायिक एकजूट दाखवत हा डाव हाणून पाडणार काय, हे पाहणेसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
इसदाचे महाराष्ट्राला देणं....
- इसदाचे यश महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच अधोरेखित केले आहे. नाशिक, गोसीखुर्द, कोयना सारखे महाराष्ट्रातील सुमारे ५०० कोटींचे अनेक जल पर्यटन प्रकल्प एकट्या इसदाच्या जोरावर मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाची सर्वदूर पर्यटन ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविताना इसदाने दीपस्तंभाची भूमिका बजावली आहे.
- आयएनएस गुलदार आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सर्वेक्षण अहवाल इसदानेच बनविला होता. तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग केंद्र हे एक राष्ट्रीय स्तरावरील स्कुबा डायव्हिंगमधील इन्स्टिट्यूट आहे. नुसता व्यवसाय करणे हा या प्रशिक्षण केंद्राचा उद्देश नसून महाराष्ट्राच्या जल पर्यटनाला दिशा दाखविण्याचे काम इसदाला बजावायचे आहे.
तेव्हाच मिळाली इसदाला परवानगी....
- जल पर्यटनात प्रशिक्षण, संशोधन आणि पर्यावरण संरक्षण करण्याच्या हेतूने इसदाची निर्मिती करण्यात आली. त्यामागे स्थानिकांना अल्प दरात जल पर्यटन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येणार होते. २०१५ मध्ये जेव्हा इसदाला अंतिम मंजुरी देण्यात आली तेव्हा अनेक अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत.
- मंत्रिमंडळाची राज्य शिक्षण संस्था म्हणून मंजुरी देण्यात आली. सीआरझेडकडून मंजुरी देताना इसदाचे खासगीकरण करण्यात येऊ नये तसेच इसदाचे बिझनेस मोड्यूल तयार करण्यात येऊ नये, अशा अटींचा त्यात समावेश आहे.
Web Summary : Concerns rise as Tarkarli's Scuba Diving Center (ISDA) faces privatization, potentially harming local businesses. ISDA, a key training institute, has boosted tourism and employment. Locals fear competition, urging unity to prevent the privatization, which could jeopardize their livelihoods despite ISDA's contributions to Maharashtra's water tourism sector.
Web Summary : तारकर्ली के स्कूबा डाइविंग सेंटर (आईएसडीए) के निजीकरण से स्थानीय व्यवसायों को नुकसान की आशंका बढ़ रही है। आईएसडीए, एक प्रमुख प्रशिक्षण संस्थान, ने पर्यटन और रोजगार को बढ़ावा दिया है। स्थानीय लोगों को प्रतिस्पर्धा का डर है, और वे निजीकरण को रोकने के लिए एकजुट होने का आग्रह कर रहे हैं, जिससे महाराष्ट्र के जल पर्यटन क्षेत्र में आईएसडीए के योगदान के बावजूद उनकी आजीविका खतरे में पड़ सकती है।