शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बीडशी तुलना करुन सिंधुदुर्गची बदनामी करण्याचा डाव; नीलेश राणेंचा वैभव नाईकांना इशारा, म्हणाले.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:54 IST

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत ...

मालवण : कुडाळमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याने खून केलेली घटना दोन वर्षांपूर्वीची होती. तेव्हा तो उद्धवसेनेत होता. माजी आमदार वैभव नाईक यांचा कार्यकर्ता होता. असे असताना आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासोबत असलेले त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे व बीडमधील संतोष देशमुख खून प्रकरणाशी तुलना करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करण्याचा वैभव नाईकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुडाळ-मालवणचे शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी दिला आहे.पैशाच्या व्यवहारातून सिद्धेश शिरसाट याने हा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी हा खून झाला तेव्हा सिद्धेश शिरसाट हा उद्धवसेनेत व माजी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत मिरवत असतानाचे अनेक फोटो आहेत. या खुनानंतर तो वैभव नाईक यांच्या पक्षाच्या आशय खाली होता व त्यांचेच काम करत होता. त्यामुळे खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कुठे गायब झाला व त्यावर आरोपींनी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कसा घटनाक्रम राबविला, याची अधिकची माहिती वैभव नाईक यांना माहीत असेल.आपण शिंदेसेनेमध्ये आठ महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता. तो खून दोन वर्षांपूर्वीच झाला होता. त्यामुळे आमच्यावर व आमच्या पक्षावर असे आरोप करताना किंवा त्याबाबतचे राजकारण करताना वैभव नाईक यांनी आपले हसू करून घेऊ नये. त्यांना डोक्याचा अजिबात भाग नसल्यामुळे किंवा बौद्धिक विकास नसल्यामुळे ते हास्यास्पद विधाने व आरोप करीत आहेत.नाहक बदनामीखरे तर बीडमधील घटना व हा खून यांचा संबंध लावून सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी करणे, हे माजी आमदारांना सोबत नाही. यापुढे सिंधुदुर्गची बदनामी सहन केली जाणार नाही. जिल्ह्याचे नाव खराब होणार नाही, याची दक्षता यापुढे त्यांनी घ्यावी. आमचे नेते एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांचे फोटो व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही. वैभव नाईक यांनी आयुष्यभर हेच केले. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधी पदावरून पायउतार व्हावे लागले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNilesh Raneनिलेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक BeedबीडPoliticsराजकारण