शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे वेंगुर्ला येथे वनस्पती संवर्धन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:12 IST

कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मिती प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देदुर्लक्षित औषधी वनस्पतीं टिकवण्याचा प्रयत्न वेंगुर्ला येथे वनस्पती संवर्धन प्रकल्प कोकणातील

वेंगुर्ला : कोकणातील शेतकऱ्यांच्या हितासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे-कलमे निर्मितीप्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला.या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतकऱ्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचविण्याच्या दृष्टीने हा प्रामाणिक प्रयत्न असल्याची माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत व लुपिन फाऊंडेशनचे अधिकारी योगेश प्रभू यांनी दिली.कोकण म्हटले की आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी, कोकम आदी फळे आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र, येथील उष्ण व दमट हवामान कोकणातील जैवविविधता टिकवण्याचा दृष्टीने अत्यंत पोषक आहे. यामध्ये मसालावर्गीय, औषधी, सुगंधी व इतर दुर्मीळ वनस्पतींचा समावेश होतो. म्हणूनच आजच्या बदलत्या वातावरणात कोकणात आढळणाºया या जैवविविधतेचा अभ्यास करणे महत्त्वाचे व आव्हानात्मक कार्य आहे.या अनुषंगाने सुरंगी, वटसोल, वावडिंग, त्रिफळ, कडीकोकम यासारख्या कोकणामध्ये नैसर्गिक अधिवासात आजही तग धरून असणाऱ्या व व्यापारीदृष्ट्या महत्त्व असूनही दुर्लक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. या पिकांखाली असलेले क्षेत्र वाढविण्यासाठी, कोकणातील शेतकऱ्यांना या दुर्लक्षित औषधी, मसाला व सुगंधी पिकांकडे वळविण्यासाठी काळाची गरज आहे.या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्यात २३ आॅगस्ट २०१८ रोजी सामंजस्य करार झाला. कोकणातील दुर्लक्षित पिकांचे सर्वेक्षण, संग्रह, जतन व विविध अभिवृद्धी पद्धती विकसित करणे व या पिकांची दर्जेदार रोपे निर्मिती करणे या प्रमुख उद्देशाने या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे पिकांची लागवड, उत्पादन, रोपवाटिका प्रक्रिया व विक्रीद्वारे कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांना, युवकांना व महिला वर्गाला नवीन संधी उपलब्ध होणार आहे. 

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवसsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण