महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:23 PM2020-03-01T22:23:49+5:302020-03-01T22:23:54+5:30

सुधीर राणे। कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित ...

Planning for a highway contractor | महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

महामार्ग ठेकेदाराचे गलथान नियोजन

Next

सुधीर राणे।
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते परिवर्तित करण्यात येत आहेत. मात्र, या रस्त्यांबाबत वाहन चालकांना माहिती नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराचे गलथान नियोजन याला कारणीभूत असून एकप्रकारे संबंधित स्थिती अपघाताला आमंत्रणच ठरत आहे.
या स्थितीतून आपली कधी सुटका होणार? असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे. कणकवली शहरात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, काही प्रकल्पग्रस्तांची जमीन महामार्ग चौपदरीकरणात गेली असली तरी अजूनही त्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या इमारती तोडण्यास त्यांनी हरकत घेतली आहे. याचा परिणाम म्हणजे संबंधित ठिकाणी महामार्ग ठेकेदाराला काम करणे शक्य होत नाही.
त्यामुळे एकूणच कामावर परिणाम झाला आहे. कणकवली शहरात उड्डाणपुलाच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता तयार करायचा आहे. त्यापैकी काही ठिकाणी सर्व्हिस रस्ता तयार झाला आहे. मात्र, कणकवली तेलीआळी डीपी रोडपासून हॉटेल मंजुनाथपर्यंत सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या परिसरात ठिकठिकाणी परिवर्तित रस्ता तयार करून काम करावे लागत आहे.
अशीच स्थिती नरडवे रोडजवळ महाडिक कंपाऊंड येथे आहे. परिवर्तित रस्ते तयार करताना ठेकेदाराकडून योग्य ते नियोजन केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आज परिवर्तित मार्ग असेल तिथेच दुसºया दिवशी तो असेल याबाबत खात्री नसल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा गोंधळ उडत आहे. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.
त्यामुळे या समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असून ठेकेदाराला या समस्येची जाणीव करून देणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित परिसरात अपघाताच्या घटना घडतच राहणार आहेत. अनेकवेळा वाहनांना ये-जा करण्यासाठी एकच परिवर्तित मार्ग असल्याने तसेच तो अरूंद असल्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत.
सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने बनविण्यात येणाºया गटारांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. गटारावरील स्लॅबही चांगल्या प्रतीचे साहित्य वापरून बनविले नसल्याने ते खचत आहेत. त्यामुळेही अपघात घडत आहेत.

Web Title: Planning for a highway contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.