शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात गुलाबी थंडीला बहर ! दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 10:52 IST

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला जोरदार सुरूवात झाली आहे. सध्या पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून, धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच नदी किनारी असलेल्या मार्गांवर पहाटे दाट धुक्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत असून धिम्या गतीने सुरु ठेवावी लागत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात गुलाबी थंडीला बहर ! दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम

सुधीर राणे कणकवली  : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीला जोरदार सुरूवात झाली आहे. सध्या पहाटे सर्वत्र दाट धुके पसरत आहे. विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी गारवा वाढत चालला असून, धुक्यामुळे वातावरण अल्हाददायक वाटत आहे. मुंबई गोवा महामार्ग तसेच नदी किनारी असलेल्या मार्गांवर पहाटे दाट धुक्यामुळे वाहतूकीवर परिणाम होत असून धिम्या गतीने सुरु ठेवावी लागत आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा खाली येत असून किमान तापमान 21 ते 23 अंश तर कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने आता गुलाबी थंडीला सुरवात झाली आहे. सकाळी व रात्री वातावरण थंड असते. अनेक ठिकाणी दाट धुके पडलेले पहायला मिळते. तरी सुध्दा दुपारी काहीसा उष्मा जणवतो. थंडी आणि उष्म्यामुळे थंडी, ताप ,खोकला आदी साथीचे आजार वाढत आहेत. त्यामुळे या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवितांना अडचणी येत आहेत . सध्या मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्त्यावरील दुभाजक, खड्डे, फलक, माती-दगड यांचा अडथळाही वाहन चालविताना होत असतो. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे वाहन चालकांना समोरील रस्ता व वाहने निट दिसत नाहीत त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु ठेवावी लागते.स्वेटर तसेच उबदार कपडे बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले असून, ग्राहकांची कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता विक्रेते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांना आवडतील व सहजरित्या वापरू शकतील असे कपडे उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, स्लिव्हलेस स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश आहे. तर तरुणांसाठी जॅकेट, झीपर, प्रिंटिंग मंकीकॅप, हँडग्लोज तसेच जाड कापड असलेले स्टायलिस्ट कपडे आदींची मागणी आहे.मुलीही या बाबतीत मागे नाहीत, लाईट रंगाच्या व झुबकेदार केसाळ असलेल्या लांब स्वेटरना अधिक पसंती देताना दिसत आहेत. थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या कपड्यांवर विशेष लक्ष दिले जाते. संपूर्ण अंग झाकेल असे उबदार कपडे ग्राहक खरेदी करत आहेत. यामध्ये विशेषत: लहान मुलांसाठी कार्टुनचे चित्र असलेली कानटोपीची चलती आहे. थंडीच्या दिवसात पायांना उब मिळावी म्हणून मोजेही खरेदी केले जात आहेत.सध्या ग्राहकांना जाहिरातीच्या माध्यमातूनही थंडी हंगामासाठी कोणते कपडे खरेदी करावे याचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे ग्राहक थेट दुकानात गेले की, त्याच कपड्यांची मागणी करतात. काही ग्राहक आपल्याला शोभून दिसतील असेच हिवाळी कपडे खरेदी करतात.सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनेही आपापल्या वेबसाईटवर ग्राहकांना स्वेटर उपलब्ध करून दिले आहेत. पुरुष, स्त्रिया व लहान मुलांसाठी शॉपिंग वेबसाईटने ऑनलाईन स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. त्यामुळे ग्राहकाना घरबसल्या खरेदी करता येत असून त्यांचा त्रास वाचला आहे.शेकोट्यांबरोबर गप्पा रंगू लागल्या!सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र बोचरी थंडी लागत असून, पहाटे धुके पडत आहे. सकाळीच थंडीचा जोर अधिक असतो . त्यामुळे सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून तरुणाई गप्पांचे फड रंगवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्‍ती स्वेटर आणि कानटोपी घालून घरा बाहेर पडत आहेत.जत्रोत्सवाचा आनंद द्विगुणित !सिंधुदुर्गातील ग्रामदैवतांच्या यात्रा सध्या सुरु असून गुलाबी थंडीच्या साथीने रात्री द्शावतारी नाट्य प्रयोग रंगत आहेत. मालवणी खाजा, चहा, भजी अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत रसिक द्शावतारी नाटकांबरोबरच जत्रोत्सवाचा आनंद लुटताना दृष्टिस पड़त आहेत.

टॅग्स :Temperatureतापमानsindhudurgसिंधुदुर्ग