शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : पिंगुळीत ग्रामस्थांचे आंदोलन, पिंगुळी-आसनाचे पाणी येथील पालकांचे शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:26 IST

शिक्षिका वेळेवर येत नसल्याने पिंगुळी-आसनाचे पाणी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळे ठोकत शाळा बंद आंदोलन केले. जोपर्यंत उशिरा येणाऱ्या शिक्षिकेच्या जागी दुसरी शिक्षिका दिली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. पिंगुळी-आसनाचे पाणी येथे पहिली ते चौथीकरिता जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेत सध्या दोन शिक्षिका कार्यरत आहेत.

ठळक मुद्देपिंगुळीत ग्रामस्थांचे आंदोलनपिंगुळी-आसनाचे पाणी येथील पालकांचे शाळा बंद तोपर्यंत शाळा बंद!

कुडाळ : शिक्षिका वेळेवर येत नसल्याने पिंगुळी-आसनाचे पाणी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी टाळे ठोकत शाळा बंद आंदोलन केले. जोपर्यंत उशिरा येणाऱ्या शिक्षिकेच्या जागी दुसरी शिक्षिका दिली जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला.पिंगुळी-आसनाचे पाणी येथे पहिली ते चौथीकरिता जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा असून या शाळेत सध्या दोन शिक्षिका कार्यरत आहेत. सुमारे १० ते १२ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शाळेतील शिक्षिका मृदुला सावंत उशिराने येतात. याकडे शासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधित शिक्षिकेची बदली करून याठिकाणी अन्य शिक्षक किंवा शिक्षिकेची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली.आंदोलनावेळी पालकांनी शाळेतील वर्गखोल्यांना कुलूप ठोकले व मुलांना व्हरांड्यात बसविले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारालाही कुलूप ठोकले होते. राजश्री काळप, प्रकाश माडये, महेंद्र पिंगुळकर, कौस्तुभ गवस, नागेश परब, सुनील सडवेलकर, किशोर गवळी, संतोष तुळसकर, उमेश तुळसकर, विद्या भगत, अमित सर्वेकर, गणपत गवळी, सुनीत सडवेलकर, रवींद्र गवळी, सीताकांत पिंगुळकर आदी पालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, आंदोलकर्त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकल्याने शिक्षिकेला बाहेरच थांबावे लागले.तोपर्यंत शाळा बंद!शाळेतील संबंधित शिक्षिका गेली दोन वर्षे उशिराने येत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही त्या शिक्षिकेची बदली होत नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरा शिक्षक येत नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन छेडणार असल्याचे पालकांनी सांगितले. अधिकाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल असल्याचे पालकांनी सांगितले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळा