ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण
By Admin | Updated: March 9, 2015 23:43 IST2015-03-09T23:11:22+5:302015-03-09T23:43:56+5:30
सावंतवाडीत रंगपंचमी उत्साहात : युवक, युवती, अबालवृध्दांनी लुटला आनंद

ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण
सावंतवाडी : सावंतवाडीत मोठ्या उत्साहात सोमवारी रंगपचमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवक युवतींनी रस्त्यावर उतरून ढोल ताशाच्या गजरात रंगाची उधळण केली. रंगपंचमीला सावंतवाडीतील काही भागात उत्सवाचे स्वरूप आले होते. सायंकाळी उशिरा मोती तलावाच्या काठावरून टेम्पोतून मिरवणुकाही काढण्यात आल्या. मात्र, कोणताही अनुचित प्रकार शहरात घडला नाही.सावंतवाडी शहरात धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी रंगपचमी असते. पण शहरातील काही भागात रविवारपासूनच रंगपचमी सुरू झाली. सोमवारी दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत दुपार नंतर रंगपंचमीत सहभाग घेतला. सावंतवाडी शहरातील अनेक भागात ढोल ताशांच्या गजरात तसेच मोठ्याने डीजे लावून युवक युवती तसेच आबालवृध्दांनीही रंगपंचमीत सहभाग नोंदवला होता. सायंकाळी उशिरा टेम्पो तसेच रिक्षेतून काही दुचाकीवरुन मिरवणूक काढली. अनेक युवकयुवती रंगात न्हाऊन गेली होती. पोलिसांनीही शहरात चोख बंदोबस्त ठेवला. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुपारपासून सायंकाळपर्यंत रंगपंचमीचा उत्सव सुरूच होता. (प्रतिनिधी)