शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता जनताच उठवेल, आमदार वैभव नाईकांची टीका 

By सुधीर राणे | Updated: May 11, 2023 16:37 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर त्यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला

कणकवली : नितिमत्ता गुंडाळून राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता राज्यातील जनताच उठवेल, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. मुख्यमंत्री शिंदेकडे नितिमत्ता नसल्याने ते राजीनामा देणार नाहीत. पण नितिमत्तेला धरून हे सरकार स्थापन झालेले नाही हे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असल्याचे ते म्हणाले.राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी निकाल दिला. यावर आमदार वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेची हाव कधीच नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे आमदार फुटल्यानंतर त्यांनी लगेच नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने शिंदे- फडणवीस सरकारवर स्थापनेवरून ताशेरे ओढले आहेत. चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे नीतिमत्तेला धरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. पण शिंदेकडे नितिमत्ता नसल्याने ते राजीनामा देणार नाहीत.शिवसेनेसोबत गद्दारी करून राज्य सरकार स्थापन केलेल्या लोकप्रतिनिधींना कधी ना कधी जनतेच्या दरबारात जावेच लागणार आहे. त्यावेळी जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका कशी चुकीची होती. केंद्राने त्यांच्यावर कसा दबाव आणला हे निकालपत्रात नमूद केले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्याकडे नितिमत्ता राहिलेली नाही हेच स्पष्ट होत आहे. तसेच त्यांनी कितीही कांगावा केलात तरी जनता त्यांचा बाजार उठविल्याखेरीज राहणार नाही असेही नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे