जनता दहशतवाद खपवून घेणार नाही

By Admin | Updated: August 12, 2014 23:13 IST2014-08-12T22:20:07+5:302014-08-12T23:13:23+5:30

दीपक केसरकर : वेंगुर्लेत शिवसेनेची सभा

People will not tolerate terrorism | जनता दहशतवाद खपवून घेणार नाही

जनता दहशतवाद खपवून घेणार नाही

वेंगुर्ले : महात्मा गांधींनी शांततामय व अहिंंसेच्या मार्गाचा वापर करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कोकण हा शांततेचे प्रतीक असलेला भाग आहे. या भागात दहशतवाद खपवून घेणार नाही. ज्यांना प्रेमाने माणसे जिंंकता येत नाहीत, तेच दहशतीचा मार्ग अवलंबतात. गेल्या १५ वर्षात शिवसैनिकांना छळून शिवसेना औषधालाही ठेवणार नाही, असे सांगणाऱ्यांना शिवसैनिक आणि जनतेने जागा दाखविली आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले.
वेंगुर्ले शिवसेनेची मासिक सभा येथील तालुका कार्यालयात दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी तालुकाप्रमुख सुरेश नाईक, महिला उपजिल्हाप्रमुख श्वेता हुले, शहर सेनाप्रमुख विवेक आरोलकर, सचिन देसाई, नितीन मांजरेकर, उपशहरप्रमुख राजन वालावलकर, अनुराधा देशपांडे, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना हडकर, निशा नाईक, बाळा दळवी, सुरेश भोसले, विवेक कुबल, दादा हुले, भोगवे सरपंच सुनील राऊत, सुहास पाटकर, रमेश नार्वेकर, उमेश येरम उपस्थित होते. यावेळी सुरेश नाईक, सुरेश भोसले, रमेश नार्वेकर, सचिन देसाई, श्वेता हुले, नितीन मांजरेकर, सुनील राऊत, दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला.(प्रतिनिधी)

Web Title: People will not tolerate terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.