मार्च २0१७ चे निवृत्तीवेतन विलंबाने
By Admin | Updated: April 5, 2017 16:33 IST2017-04-05T16:33:53+5:302017-04-05T16:33:53+5:30
राज्यस्तरावर तांत्रिक अडचणी

मार्च २0१७ चे निवृत्तीवेतन विलंबाने
लोकमत आॅनलाईन
सिंधुदुर्गनगरी, दि. ५ : सर्व निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना कळविणेत येते की, दरवर्षी राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारकांचे मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन आर्थिक वर्ष संपल्यानंतर म्हणजेच माहे एप्रिल मध्ये प्रदान केले जाते. मात्र यावर्षी माहे मार्च २0१७ चे निवृत्तीवेतन प्रदान करणेकामी राज्यस्तरावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने निवृत्ती वेतनाचे प्रदानास विलंब होत आहे. तांत्रिक अडचण शासन स्तरावरून दूर झाल्यानंतर तात्काळ निवृत्ती वेतन बँक खाती जमा करण्याची व्यवस्था केलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांना होत असलेल्या दिरंगाईबद्दल जिल्हा कोषागार अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.