उमेदवारीचा निर्णय पवारच घेतील

By Admin | Updated: August 14, 2014 22:39 IST2014-08-14T21:28:55+5:302014-08-14T22:39:30+5:30

व्हिक्टर डान्टस : नाव न घेता राणेंना टोला

Pawar will take the decision of candidature | उमेदवारीचा निर्णय पवारच घेतील

उमेदवारीचा निर्णय पवारच घेतील

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँॅग्रेस पक्ष सावंतवाडी विधानसभेची जागा लढवणार असून, या जागेवर कोणाला उभे करायचे, हा आमच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँॅग्रेसचे निर्णय शरद पवारच घेतील त्यात दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी काँॅग्रेस नेते नारायण राणे यांचे नाव न घेता हाणला.
डान्टस हे सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सुरेश गवस, सुनिल लिंगवत, गणेश लुडबे, एम. डी. सावंत आदी उपस्थित होते. यावेळी डान्टस म्हणाले, सावंतवाडीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. आमच्याकडे पक्षाने अर्ज पाठविले असून, इच्छुक उमेदवार अर्ज भरून देतात ते अर्ज पक्षाकडे पाठवून दिले जाणार आहेत. आतापर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज मागितले आहेत. तसेच सावंतवाडी मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णय अद्यापपर्यंत पक्षस्तरावर झाला नाही. अनेक जण पक्षात इच्छुक आहेत. माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी पक्ष नेतृत्वाची भेट घेतली असेल तर आम्हाला माहीत नाही. तसेच माजी आमदार राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशाबाबत आम्ही अनभिज्ञ असल्याचेही ते म्हणाले.
सावंतवाडीतील उमेदवार ठरविताना पक्षाचे नेते काँॅग्रेस नेते नारायण राणे यांना विचारणार काय, असा सवाल केला असता, पक्षातील निर्णय आमचे नेते घेतात ते कुणाला विचारून घेण्याचा प्रश्न येत नाही. जर तेलींना यायचे असेल आणि उमेदवारी द्यायची असेल तर अन्य पक्षातील नेत्यांना का विचारायचे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते यावेळी पार पडले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Pawar will take the decision of candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.