कुडाळात पदाधिकाऱ्यांकडून पवारांचे स्वागत
By Admin | Updated: March 30, 2015 00:23 IST2015-03-29T22:24:44+5:302015-03-30T00:23:50+5:30
राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी आले. यावेळी गोव्यातून मालवणच्या दिशेने जात असताना

कुडाळात पदाधिकाऱ्यांकडून पवारांचे स्वागत
कुडाळ : कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी आले. यावेळी गोव्यातून मालवणच्या दिशेने जात असताना कुडाळ येथे तालुका राष्ट्रवादीच्यावतीने शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अमित सामंत, जिल्हा परिषद सदस्य रेवती राणे, भास्कर परब, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी मालवण-देवली येथे शरद पवार यांचे स्वागत केले. यावेळी सावंतवाडी युवक तालुकाध्यक्ष उदय भोसले, विधानसभा अध्यक्ष हार्दिक शिगले, उपाध्यक्ष सुनील राऊळ, मंदार सावंत, धीरज पांचाळ, तालुकाध्यक्ष विजय कदम, सत्यजीत कदम, अशोक पवार, राजा रावराणे, वैभववाडी युवक अध्यक्ष महेश रावराणे, संतोष बोडगे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)