सावंतवाडीत पथदीप दिवसाढवळ्या सुरू
By Admin | Updated: September 2, 2014 23:17 IST2014-09-02T23:14:59+5:302014-09-02T23:17:28+5:30
वीज वितरण विभाग वीज वाया

सावंतवाडीत पथदीप दिवसाढवळ्या सुरू
सावंतवाडी : शहरातील मोती तलावाच्या काठी लावण्यात आलेले पथदीप गेले चार दिवस भर दुपारच्यावेळीही सुरू असतात. तर रात्रीच्या वेळी मात्र दिव्यांचा खेळखंडोबा सुरू असतो. भर दिवसा पथदीप सुरू ठेवून वीज वितरण विभाग वीज वाया घालवित असल्याचे दिसून येत आहे.
याऊलट रात्रीच्या वेळी मात्र वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू असतात. गणेश चतुर्थीच्या अगोदर अशाप्रकारे रात्रीच्या वेळी वीज खंडित केली होती. गणेश चतुर्थीपूर्वी विद्युत वितरणचा खेळखंडोबा सुरू होता. एकीकडे विजेची कमतरता असल्याचे भासवून वीज खंडित करावी आणि दुसरीकडे दिवसभर पथदीप सुरू ठेवून वीज वाया घालवावी, असा प्रकार सर्रास दिसत आहे. नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करतानाच विद्युत वितरणकडून होणाऱ्या या चुकांबाबत कंपनीने गांभिर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे. (वार्ताहर)