दोडामार्ग : तालुक्यातील फुकेरी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे. तहसीलदार संजय कर्पे यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. डोंगराला मोठे भगदाड पडलेले नाही पण भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करून त्याबाबत अहवाल सादर कण्याची मागणी करण्यात आली .गतवर्षी अतिवृष्टीमुळे झोळंंबे येथे सुमारे एक किलोमीटर डोंगर खचून भूस्खलन झाले होते. त्या अपघातात काही ग्रामस्थ जखमीही झाले होते. तर काहींच्या घरात मातीचा लोट घुसल्याने काही दिवस घराच्या बाहेर वास्तव्य करावे लागले होते. यावर्षी पहिल्याच पावसात फुकेरी येथे झालेल्या भूस्खलनाची दोडामार्गचे तहसीलदार संजय कर्पे यांनी पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी राजन गवस तलाठी बी. एन. राठोड उपस्थित होते.काही वर्षांपूर्वी या डोंगरात दगड उत्खननासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जायचे. त्यामुळे डोंगराचा काही भाग जीर्ण झाल्याचे कर्पे यांनी सांगितले. यावेळी फुकेरी गावच्या सरपंच सावित्री नाईक, पोलीस पाटील महेश आईर, झोळंबे गावचे सरपंच राजेश गवस, संतोष सावंत, शशिकांत आईर, भाऊ आईर, सतीश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कुंपण करणारसद्यस्थितीत या डोंगराचा आजूबाजूच्या गावांना कोणताही धोका नसल्याचे सांगत जीर्ण डोंगराच्या आसपास कोणी जाऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात कुंपण करण्यात येणार असून डोंगर पायथ्याशी गुरे चरविणे किंवा अन्य कारणांसाठी न जाण्याच्या सूचनादेखील यावेळी तहसीलदार कर्पे यांनी ग्रामस्थांना केल्या.
डोंगराचा काही भाग खचला, तहसीलदारांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:12 IST
दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील डोंगराचा काही भाग खचला आहे.तहसीलदार संजय कर्पे यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. डोंगराला मोठे भगदाड पडलेले नाही पण भविष्यात कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करून त्याबाबत अहवाल सादर कण्याची मागणी करण्यात आली .
डोंगराचा काही भाग खचला, तहसीलदारांनी केली पाहणी
ठळक मुद्देडोंगराचा काही भाग खचला, तहसीलदारांनी केली पाहणी भूगर्भ शास्त्रज्ञांंंकडून अहवाल सादर करण्याची मागणी