...अन्यथा भाजप स्वबळावर
By Admin | Updated: January 17, 2017 00:08 IST2017-01-17T00:08:27+5:302017-01-17T00:08:27+5:30
रवींद्र चव्हाण : निवडणुकीसाठी भाजपची पूर्ण तयारी

...अन्यथा भाजप स्वबळावर
वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये जागा वाटपाबाबत शिवसेनेने भाजपबरोबर सन्मानपूर्वक बोलणी केली तरच युती करणार, अन्यथा भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे भाजप नेते तथा बंदर राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण यांनी सांगितले.
फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच उमेदवारांची चाचपणी करण्याकरिता वेंगुर्ले तालुका भाजपच्यावतीने येथील स्वामिनी मंगल कार्यालयात भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक तसेच कार्यकर्ता मेळावा सोमवारी झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अॅड. अजित गोगटे, नगराध्यक्ष राजन गिरप, राजन तेली, संदेश पारकर, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, तालुकाध्यक्ष बाळू देसाई, काका कुडाळकर, जयदेव कदम, अतुल रावराणे, बाबा मोंडकर, यशवंत आठलेकर, सुहास गवंडळकर, बाळू प्रभू, नगरसेवक मनोज नाईक, सुषमा प्रभू खानोलकर, साईप्रसाद नाईक, राजू राऊळ आदी उपस्थित होते.