शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवगडात ३० पासून बिच महोत्सव, व्यापारी पर्यटन संस्थेचे आयोजन : शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:11 IST

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी देवगड बिच येथे जल्लोष २०१८  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांची विशेष उपस्थिती मधुरा कुंभार, कविता निकम ठरणार आकर्षण विविध स्पर्धांचे आयोजन

देवगड : सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्यावतीने ३० व ३१ डिसेंबर रोजी देवगड बिच येथे जल्लोष २०१८  महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.३० रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन कोकण माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांची विशेष उपस्थिती आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, तहसीलदार वनिता पाटील, पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, उद्योजक नंदकुमार घाटे, ए.के.जे. फिशरीजचे एस.एम. बद्रुद्दीन, मत्स्योद्योगपती द्विजकांत कोयंडे, सहदेव बापर्डेकर, दिलीप भगत, सागर फडके, एकनाथ तेली, संदीप तेली, विनायक पारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता शालेय चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता वाळुशिल्प स्पर्धेचे उद्घाटन, ६.३० वाजता सोहळयाचे उद्घाटन, ७.३० वाजता नुपूर कलामंदिर (देवगड) उद्घाटनपर कार्यक्रम, ८ वाजता वाळुशिल्प स्पर्धेचे बक्षीस वितरण, ८.३० वाजता मँगो इव्हेंट, रत्नागिरी प्रस्तुत सेलिबे्रटी नाईट व सूर नवा, ध्यास नवा फेम मधुरा कुंभार यांचा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे.३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा, ६ वाजता पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण, ६.३० वाजता निलोफर खान प्रस्तुत डायमंड डान्स क्रु. मुंबई यांचा डान्सिंग धमाका, रात्री ९ वाजता नववर्ष भेटवस्तू वितरण, ९.३० वा. मॅप इव्हेंट प्रस्तुत आॅर्केस्ट्रॉ  सूरसंगीत पार्श्वगायीका कविता निकम व सारेगम फेम सिध्दार्थ जाधव सहभागी होणार आहेत. 

रात्री १२ वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ मेमन व तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.मधुरा कुंभार, कविता निकम ठरणार आकर्षणया महोत्सवाला सूर नवा, ध्यास नवा फेम मधुरा कुंभार, सारेगम फेम सिध्दार्थ जाधव, पार्श्वगायिका कविता निकम यांचे विशेष आकर्षण ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, वाळू शिल्प स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग