गणेशोत्सव मंडळांनी स्वयंसेवक नेमावे

By Admin | Updated: August 24, 2014 00:50 IST2014-08-24T00:47:43+5:302014-08-24T00:50:49+5:30

दोडामार्ग पोलीस निरीक्षकांच्या सूचनां

Organize volunteers by Ganeshotsav Mandals | गणेशोत्सव मंडळांनी स्वयंसेवक नेमावे

गणेशोत्सव मंडळांनी स्वयंसेवक नेमावे

कसई दोडामार्ग : कोकणातील गणेशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. हा सण गणेशमूर्ती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत शांततेत साजरा करावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत, अशी सूचना दोडामार्ग पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थी सण शांततेत पार पाडण्याविषयी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, पायलट, वीज वितरण अधिकारी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी, शांतता कमिटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी या कालावधीत वीज चोरी न करता रिसतर अर्ज करून पुरवठा करून घ्यावा, जनरेटर उपलब्ध करून ठेवा, बाजारपेठांमध्ये एसटी व खासगी वाहने उभी करू नयेत, अशा सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या. तसेच वीज पुरवठा सुरळीत ठेवा, अशी सूचना वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांना केली. (वार्ताहर)

 

Web Title: Organize volunteers by Ganeshotsav Mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.