बेळगाव येथे ८पासून सैन्य भरतीचे आयोजन
By Admin | Updated: November 28, 2014 00:12 IST2014-11-27T22:57:01+5:302014-11-28T00:12:44+5:30
खुल्या वर्गवारीमधून फक्त म्युजिसियन या पदाकरिता भरती

बेळगाव येथे ८पासून सैन्य भरतीचे आयोजन
रत्नागिरी : सोल्जर जीडी, सोल्जर टीडीएन व सोल्जर क्लर्क (एसडी) या पदांकरिता ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत शिवाजी स्टेडियम, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे भरती आयोजित करण्यात आली आहे.
युध्द विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या भावाकरिता ही भरती आहे. भरती रॅलीमध्ये खुल्या वर्गवारीमधून फक्त म्युजिसियन या पदाकरिता भरती करण्यात येणार आहे.
इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युध्द विधवा यांच्या पाल्यांनी या भरतीकरिता शिवाजी स्टेडियम, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर, बेळगाव येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. या भरतीमुळे माजी सैनिक विधवा पत्नी, त्यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी यात भाग घ्यावा असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केले
आहे. (प्रतिनिधी)