शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीर्ण शाळांच्या सर्व्हेचे आदेश, २९६ शाळांना स्वत:ची इमारतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:09 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९६ जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत भरत नाहीत, अशी माहिती शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांचा सर्व्हे करण्याचे आदेश सभापती प्रीतेश राऊळ यांनी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीर्ण शाळांच्या सर्व्हेचे आदेशजिल्हा परिषदेच्या २९६ शाळांना स्वत:ची इमारतच नाही

ओरोस : सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील २९६ जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतीत भरत नाहीत, अशी माहिती शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. या सभेत जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या शाळांचा सर्व्हे करण्याचे आदेश सभापती प्रीतेश राऊळ यांनी प्रशासनाला दिले.जिल्हा परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात प्रीतेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची सभा झाली. यावेळी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी भारती संसारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सदस्य सरोज परब, विष्णुदास कुबल, सुनील म्हापणकर, उन्नती धुरी, संपदा देसाई यांच्यासह गटशिक्षणाधिकारी व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेवेळी दुखापत झालेल्या मुलांना उपचार करण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यात आली. औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा आधार घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अभ्यास सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेला एक संगणक व एक प्रिंटर देण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.तेजस शाळेसाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव येत आहेत, असे संसारे यांनी सांगितले. यावेळी त्या ४३ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश सभापती राऊळ यांनी दिले.कुडाळात ६१ शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्याकुडाळ तालुक्यात ६१ शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे. यातील २३ शाळांत पाचपेक्षा कमी मुले आहेत. तरीही या शाळांत दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे ज्या शाळेत जास्त पटसंख्या आहे त्या शाळेत यातील शिक्षक देण्याचे अधिकार आपल्याला मिळावेत, अशी मागणी कुडाळ गटशिक्षणाधिकारी यांनी केली. त्यानुसार शिक्षकांना कामगिरीवर काढण्याचा अधिकार सभागृहाने त्यांना दिला.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाsindhudurgसिंधुदुर्ग