शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 16:02 IST

मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

ठळक मुद्देशिवजयंतीला दांडी मारणारे शिक्षक अडचणीत, पगार कापण्याचे बीडीओंचे आदेशपंचायत समिती मासिक सभेत माहिती

सिंधुदुर्ग : मालवण पंचायत समिती सभेत शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळांना देण्यात आले होते. मात्र बहुतांशी शाळांमध्ये शिवजयंती कार्यक्रमासाठी शिक्षकांनीच दांडी मारल्याची धक्कादायक माहिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सभागृहात दिली.

याबाबत गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेताना शिवजयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित शिक्षकांचा त्या दिवशीचा पगार काढू नका, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या.दरम्यान, शिरवंडे प्रशालेत शिवजयंती साजरी करण्यासाठी मुख्याध्यापिके व्यतिरिक्त अन्य शिक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवजयंती कार्यक्रमही १५ मिनिटात गुंडाळण्यात आला. शिवजयंतीला दांडी मारणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी घाडीगांवकर यांनी सांगितले. याबाबत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल बनवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी सभापती सोनाली कोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, विनोद आळवे, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, मनीषा वराडकर, निधी मुणगेकर, मधुरा चोपडेकर, सागरिका लाड, गायत्री ठाकूर यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या श्याम चव्हाण यांचे सभापती कोदे व बागवे यांनी स्वागत केले. तर मालवण तालुक्यात नरेगा अंतर्गत ३ कोटी ५७ लाखाचा निधी खर्ची घालण्यात आला असून जिल्ह्यात मालवण तालुका अग्रक्रमावर आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी पराडकर यांनी दिली.ठेकेदाराकडून काजू पिकाचे नुकसानसध्या काजू पिकाचा हंगाम सुरू असताना वीज वितरणच्या ठेकेदाराकडून श्रावण परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता काजूच्या झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जात आहे. काजू पिकाचा हंगाम संपल्यानंतर फांद्या तोडण्यास काही हरकत नसताना ठेकेदाराकडून मनमानी सुरू असल्याचे राजू परुळेकर यांनी सांगितले. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान वसूल करून द्यावे, अशी सूचना मांडली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग