शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:25 IST

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  आंदोलनजीवी लोक विविध मुद्द्यावर आंदोलने घडवतात

कणकवली: गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यात जीएसटी, एपीएमसी यांचा समावेश आहे. हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र, आता काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यालाच विरोध करीत आहेत.देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,मेघा गांगण,पूजा कर्पे, संतोष पूजारे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.विनोद तावडे म्हणाले, कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अदानी बरोबर त्यांच्या राज्यात करार केले आहेत .देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मैदान दिले. तर त्याबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली.पण देशात २७ हून अधिक मैदानाना राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरु यांचे नाव आहे. त्याबद्दल काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत. असा टोला विनोद तावडे यांनी यावेळी लगावला.देशात महात्मा गांधी,जयप्रकाश नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक आंदोलनात दिसतात. एकत्रितपणे ठरवून आंदोलने करतात.त्यांना आंदोलनजीवी लोक असे नाव ठेवले आहे . दिल्ली येथे रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .त्यांना मैदानात आंदोलन करता आले असते. पण तसे झाले नाही.त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार काही अन्याय करतेय का ?यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. आंदोलन भडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना ते शक्य झालेले नाही.मोदी सरकार गेली ७ वर्षे आहे. त्यात एक तरी भ्रष्टाचारी व्यक्ती दाखवावी . तेही करता येत नाही . त्यामुळे एक प्रकारे विरोधाला फक्त विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिले आहे. असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले. 

 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेsindhudurgसिंधुदुर्ग