शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी रचलाय बनाव: राजेंद्र राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 20:20 IST

वैभववाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे.

वैभववाडी(सिंधुदुर्ग ): तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमध्ये 75 सदस्य बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी सर्वाधिक 27 सदस्य भाजपाचे आहेत. परंतु नेत्यांना खूश करण्यासाठी विरोधकांनी बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य आपले असल्याचा बनाव रचला आहे. प्रत्यक्षात योग्य उमेदवार मिळाले नसल्याने विरोधकांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली असून काहींच्या अपत्यांची खोटी शपथपत्रे दाखल केली आहेत, असा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 125 सदस्यांपैकी 8 जागा रिक्त राहिल्या असून उर्वरित 117 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अर्ज माघारीनंतर तब्बल 75 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट होताच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बिनविरोध सदस्यांच्या संख्येवरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. बिनविरोध 75 पैकी 59 सदस्य समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा दावा राणे समर्थक पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे यांनी माध्यमांकडे केला होता. त्यांचा दावा खोडून काढताना समर्थ विकास पॅनेलचे 25 सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट करीत 'समर्थ'पेक्षा भाजपाचे 2 सदस्य अधिक असल्यानचे राणे यांनी पत्रकात नमूद केले आहे.पत्रकात राजेंद्र राणे यांनी पुढे म्हटले आहे की, काही गावात भाजपाने ग्रामविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रामविकास आघाडीचे 17 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बिनविरोध 75 सदस्यांपैकी 59 समर्थ विकास पॅनेलचे असल्याचा विरोधकांचा दावा म्हणजे आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी रचलेला निव्वळ बनाव आहे. तसेच सरपंचपदासाठी 10 गावांत भाजपाचे उमेदवार असून 6 ठिकाणी ग्रामविकास आघाडीला भाजपाचा उघड पाठिंबा आहे.आता निवडणूक लागलेल्या 17 पैकी 15 ग्रामपंचायतींवर अनेक वर्षे विरोधकांकडे तर केवळ 2 ग्रामपंचायती भाजप-शिवसेनेकडे होत्या. त्यामुळे आम्ही सर्व गावात ताकदीने उभे राहत पॅनेल केली हेच आमचे यश आहे. गावातील लोकांना आपला सरपंच थेट निवडून देण्याचा अधिकार भाजपनेच जनतेला दिला आहे. त्यामुळे जनता भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असा विश्वास राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.हा 'त्यांचा' नैतिक पराभवअनेक वर्षे ग्रामपंचायतीची सत्ता असणा-यांपेक्षा भाजपचे बिनविरोध सदस्य अधिक आहेत. तर हा त्यांचा नैतिक पराभव आहे, अशी टीका करीत ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच उंबर्डे मेहबूबनगर येथून ज्युलेखा नासीर सारंग यांना आणि कोळपे येथून नजिया साजिद पाटणकर यांच्या रुपाने मुस्लिम समाजाचे सदस्य भाजपाने बिनविरोध निवडून आणले आहेत. तर नावळेत बिनविरोध निवडून आलेल्या 6 पैकी 4 सदस्य भाजपाचे आहेत. सडुरेतील 7 पैकी 5, निमअरुळेत 5 व जांभवडेत 6 पैकी 3 सदस्य भाजपाचे आहेत. अरुळे गावातील सरपंचपदाचे तिन्ही उमेदवार भाजपा-शिवसेना विचाराचे आहेत,असा दावा राजेंद्र राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

टॅग्स :BJPभाजपा