शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवसेनेचे शिलेदार समृद्ध, विरोधकांनी काळजी करू नये; अनिल देसाई यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:03 IST

शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चे अवलोकन करावे. शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही अंगावर घेण्यास तयार

कणकवली : प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाचा घटक आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे. शिवसेना काल होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी स्वतःचे उद्या काय होईल याची काळजी करावी. शिवसेनेची काळजी करू नये. असा उपरोधिक टोला शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी विरोधकांना लगावला.कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात आज, बुधवारी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात खासदार अनिल देसाई बोलत होते.खासदार देसाई म्हणाले, एकवेळ तुम्‍ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना इथल्‍या जनतेनेच जागा दाखवून दिली आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चे अवलोकन करावे. तसेच शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचा इशाराही दिला.कोविड काळात जीवाची बाजी लाऊन जनतेला शिवसैनिकांनी सेवा दिली. निराधार कुटुंबांना आधार दिला. कोरोनाच्या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवणारे कणखर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला लाभले आहेत. त्यांनी केलेली विकासकामे तसेच त्यांचे विचार घराघरात पोहचवा. तसेच जिल्ह्यातील तिन्ही आमदार शिवसेनेचेच असतील यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.केंद्रीयमंत्री राणेंनी किती निधी दिला?वैभव नाईक म्हणाले, आपली लढाई भाजपाशी आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ठाकरे सरकारने केलेली कामे गावागावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात वेगाने परिवर्तन होत आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचा विजय नक्की आहे. केंद्रीयमंत्री राणे यांनी वर्षभरात जिल्ह्यात किती निधी दिला ते  जाहीर करावे. केवळ शिवसेनेवर टीका करण्याचे काम राणे कुटुंबीय करतात.संदेश पारकर म्हणाले, शिवसेना ही एक पेटता निखारा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकजुटीने शिवसंपर्क अभियान यशस्वी करून जनतेपर्यंत शिवसेनेचे विचार पोहचवूया. सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत घोटाळ्यांची मालिका सुरु आहे.त्यामुळे येत्या  निवडणुकीत  जिल्हा परिषदेवर भगवा फडकणारच आहे.मात्र, आपणही विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करूया.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, स्वप्नील टेंबुलकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाAnil Desaiअनिल देसाई