शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

ठळक मुद्देकुडासे गावाच्या विभाजनास विरोध, अधिसूचना रद्द करावी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

दोडामार्ग : जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारूप अधिसूचनेनुसार केलेल्या कुडासे गावच्या विभाजनास कुडासे ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारलेली अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कुडासे येथील सातेरी भावई मंदिरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली.ग्रामस्थांच्यावतीने गणपत (राजन) देसाई यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, सरपंच आणि त्यांचे पती जे विद्यमान सदस्य आहेत, त्यांनी मिळून हे कट कारस्थान केले आहे. त्यांनी शासनाला चुकीची माहिती दिली. तिलारी नदीवर दहा कोटी रुपये खर्चून भला मोठा पूल बांधण्यात आला आहे. शिवाय गावात आठ कॉजवे आहेत. असे असताना वानोशीतून कुडासेत जायला बारा ते सोळा किलोमीटर अंतर पडते, अशी चुकीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे .तिलारी नदीमुळे भौगोलिकदृष्ट्या गावाचे दोन भाग होत असले तरी गाव विभाजनाची मागणी कुणीही केली नव्हती. २००४ मध्ये झालेल्या ग्रामसभेतही गाव विभाजनाच्या विरोधाचा एकमुखी ठराव घेण्यात आला होता. मात्र, २०१७ मध्ये वानोशीवाडी येथे पाणीपुरवठा योजनेसंदर्भात प्रभाग सभा घेण्यात आली.

यावेळी आयत्या वेळच्या विषयात विभाजनासंदर्भात ठराव घेण्यात आला. त्याला उपसरपंच हरी देसाई यांनी आक्षेप घेत गाव विभाजनाच्या विषयावर संपूर्ण गावाची स्वतंत्र सभा घेण्याची मागणी केली. तसा ठरावही सर्वानुमते मंजूर केला. त्यानंतर तहकूब मासिक सभेत ९ पैकी केवळ ३ सदस्य उपस्थित असताना गाव विभाजनाचा ठराव घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले. त्याला सूचक आणि अनुमोदक सरपंच आणि सरपंचांचे पती या दोघांनीच संमती दिली.सरपंचांकडून प्रशासनाला चुकीची माहितीएकंदरीत सरपंच आणि त्यांचे पती या दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर करून प्रशासनाला चुकीची माहिती दिली. तसेच गावातील लोकांना माहिती न देता परस्पर ठराव मांडले गेले. प्रशासनानेही संपूर्ण गावाचा विभाजनाला असलेला विरोध लक्षात घेतला नाही. त्यामुळेच चुकीच्या पद्धतीने गावावर अन्याय करणारी अधिसूचना प्रसिध्दी करण्यात आली असून, ती रद्द करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली .चुकीच्या प्रकारची अधिसूचनागाव विभाजनामुळे धनगरवाडी, देवमळावाडी व वानोशीवाडी असा कुडासे गाव बनणार असला तरी त्या वाडीतील बहुसंख्य गावकऱ्यांना विभाजन नको आहे. त्यासाठी आक्षेपाच्या पत्रावर त्यांनी सह्याही केल्या आहेत. कुडासे गाव म्हणून आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि यापुढेही राहणार. त्यामुळे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने काढलेली अधिसूचना रद्द करून गावातील शांतता अबाधित ठेवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग