शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेसमोर जनमत टिकविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 10, 2014 01:36 IST

काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला : नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष

रजनीकांत कदम ल्ल कुडाळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ- मालवण मतदारसंघाचे सत्ताधारी काँॅग्रेस पक्षाला या मतदार संघामध्ये घसरलेली मतांची टक्केवारी व जनमत राखण्याचे आव्हान असणार आहे. तर शिवसेना प्रणित महायुतीला त्यांच्या बाजूने असलेले आशाभूत जनमत विधानसभेपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान राहणार आहे. एकंदरीत, या मतदारसंघात सद्यस्थितीत शिवसेनेचे पारडे जड असल्याने काँग्रेस पक्षाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. दरम्यान, उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. कुडाळच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष टाकले असता, या मतदारसंघात कुडाळ व मालवण हे दोन तालुके येतात. राज्यात नव्यानेच हा मतदारसंघ इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी लोकसंख्येचा आहे. या मतदारसंघात पहिला आमदार होण्याचा मान जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी मिळविला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांचे सिंहावलोकन केले असता काही गोष्टी प्रामुख्याने निदर्शनास येतात. गेल्या निवडणुकीमध्ये काँगे्रसचे पक्षाचे उमेदवारी नारायण राणे हे शिवसेनेच्या नवखा उमेदवार वैभव नाईक समोर उभा असताना २४ हजार ४00 मतांनी निवडून आले होते. त्यांच्या मागील निवडणुकीच्या मताधिक्याच्या मनाने हे खूपच कमी होते. याचवेळी कुडाळ तालुक्यातील काही भागांमधून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या मतदारसंघातील सद्यस्थिती पाहता, काँग्रेस पक्षाला मोठे आव्हान राहणार आहे. कारण या मतदारसंघात विविध कारणांमुळे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी आणि जनमत घसरलेले आहे. कारण कुडाळ तालुक्यातील आकारीपड, वनसंज्ञा तसेच एमआयडीसी व इतर रखडलेले प्रकल्प, मालवणमधील वादग्रस्त सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ आदी वादग्रस्त प्रकल्प, मच्छिमारांचे न सुटलेले प्रश्न, दोन्ही तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे न सुटलेले प्रश्न, गौण खनिज बंदीमुळे व्यावसायिक व जनतेचे झालेले हाल, तसेच अन्य अनेक अपूर्ण प्रकल्प, तसेच विकासकामांची खालावलेली प्रतवारी व आता मोदी सरकार व महायुतीच्या प्रभावामुळे काँग्रेसला या ठिकाणी आव्हान टिकविणे कठीण जाणार आहे. या मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी उभारी घेतली आहे. वैभव नाईक हे या मतदारसंघातून २३,९५२ मतांनी नारायण राणे विरोधात पराभूत झाले होते. परंतु त्यानंतर मागील ५ ते ६ वर्षात त्यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी विशेष लक्ष पुरविले आहे. याच मतदारसंघातून पुढील विधानसभा लढविण्याचा निर्धार करून त्यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. गावागावात शाखा उभारून कार्यकर्त्यांना संघटीत केले. याचा परिणाम म्हणून लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना २१, ८८३ हजारांचे मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. सत्ताधाऱ्यांनी न सोडविलेल्या अनेक प्रश्नांमुळे येथील जनता शिवसेनेकडे आशाभूत नजरेने पहात आहे. केंद्रातही भाजप आल्याने या परिवर्तन लाटेचा परिणाम राज्यातही होईल, असा जनतेचा दृष्टीकोन आहे. लोकसभेत काँग्रेसचे घटलेले मताधिक्य सेनेच्या बाजूने जाईल, यात शंका नाही. शिवसेनेकडून येथील जनतेसाठी लोकाभिमुख व विकासात्मक अजेंडा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालवण व कुडाळ शहरांमध्येही शिवसेनेच्या बाजूने मताधिक्य वाढले असून हे मताधिक्यच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा मतदारसंघातून काँगे्रेस पक्षाची येथून पिछेहाट झाली असली तरी या पिछेहाटीचा अभ्यास करून येथील काँगे्रस पदाधिकारी नेते पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करू शकतात. कारण काँग्रेसमधील महत्त्वाचे पदाधिकारी व नेते या दोन तालुक्यातील असून त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. लोकसभेत झालेली पिछेहाट भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्ष जोमाने काम करणार आहे.