शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकच बंडखोरांना त्यांची जागा दाखवेल! शिवसेना उपनेते गौरीशंकर खोतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 14:36 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड अभेद्य राहील

कणकवली : शिवसेनेने सर्वसामान्य लोकांना मोठ्या पदांपर्यंत पोहोचवले आहे. कोण आमदार, तर कोणाला खासदार,मंत्री केले. तेच लोक आता बंडखोरी करत शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत. शिवसेना केव्हाही संपणार नाही. कारण, यापूर्वीही अनेक संकटांना तोंड देत शिवसेनेने उभारी घेतली आहे. बंडखोरांना शिवसैनिकच त्यांची जागा दाखवेल असा इशारा शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिला आहे.तसेच दीपक केसरकर यापुढे पुन्हा निवडून येणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमुळे अपार सत्तेची पदे भोगली आहेत. असेही ते म्हणाले. कणकवली येथील विजय भवन येथे आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख निलम सावंत-पालव, कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शैलेश भोगले आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.गौरीशंकर खोत म्हणाले,  माझी शिवसेना उपनेते पदी निवड झाली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. शिवसेनेवर आतापर्यंत अनेक संकटे आली. मात्र, भविष्यात शिवसैनिक अजून जिद्दीने काम करतील. जे लोक अपार सत्ता उपभोगून शिवसेनेला बाजूला करत सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जागा दाखविण्यात येईल. आमदार केसरकर यांनी किती पक्ष बदलले आहेत, हे जनतेला माहीत आहे. स्वतः मंत्री पदासाठी शिवसेनेत आले. आता शिवसेनेवर टीका करत आहेत. जिल्ह्यातील शिवसेना मजबुत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड अभेद्य राहील, असा विश्वास गौरीशंकर खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाDipak Kesarkarदीपक केसरकर