शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा फक्त ५० टक्केच निधी खर्च !, राजन तेली यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:37 IST

पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच ही परिस्थिती उदभवली

कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या १७० कोटी पैकी आतापर्यंत फक्त ५० टक्केच म्हणजे केवळ ८८ कोटी रुपयेच खर्च झाला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचा प्रशासनावर अंकुश नसल्यानेच ही परिस्थिती उदभवली आहे.स्थानिक विकास कार्यक्रमाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मार्च महिन्याचे पंधरा दिवस संपले असून ही मंजुरी केव्हा मिळणार? जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार यावरून दिसून येत आहे.मार्च अखेर पर्यत हा निधी खर्च न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन भाजपच्यावतीने  करण्यात येईल. असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला आहे. कणकवली येथील भाजप जिल्हा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तेली म्हणाले, आता होळी सण येत आहे. कोकणात होळी सणाला येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी अडचण झाली आहे.एसटी कामगारांचा  संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे बस अभावी हाल होत आहेत. त्याला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत. याबाबत मंगळवार पर्यंत न्याय न मिळाल्यास भाजप विधिमंडळात आवाज उठवणार आहे.सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले अनिल परब मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील एसटी बसस्थानक व अन्य कामे  व्यवस्थितरित्या होतील. अशी अपेक्षा होती. मात्र, कोकणी जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. आता होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करताना वारेमाप पैसे द्यावे लागत आहेत. अनेक खासगी बसवाले त्यांची लूट करत आहेत. मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. संपकरी लोकांना थांबवण्यासाठी शासनाला कुठल्याही प्रकारचे यश आलेले नाही. उत्तरप्रदेश मध्ये परिवहन सेवा फायदेशीर ठरत आहे. मग आपल्या राज्यात नेमकी गळती कुठे लागली आहे? गोंधळ कुठे सुरू आहे? याची सखोल चौकशी व्हायला हवी.एसटी बसस्थानके नुतनीकरण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधी देण्यात आला होता. ती कामे या सरकारने ठप्प केली आहेत. जिल्ह्यातील बसस्थानकांची अवस्था बिकट आहे. कणकवली, मालवण,सावंतवाडी या बसस्थानकांची अवस्था वाईट आहे.त्यामुळे पुढील काळात आम्ही तिव्र आंदोलन करणार आहोत. कुंभवडे व अन्य छोटी धरणे झाली आहेत. पण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे जलसंधारण विभागाच्या विरोधातही आम्ही आंदोलन करणार आहोत. ज्या ठिकाणी भूसंपादन न करता कामे चालू केली, त्या विरोधात आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशारा राजन तेली यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली