एक निलंबित, दुसऱ्याची बदली

By Admin | Updated: April 9, 2015 00:01 IST2015-04-08T23:17:16+5:302015-04-09T00:01:14+5:30

वाहनधारकांकडून पैसे घेतले : पोलीस अधीक्षकांची कारवाई

One suspended, one for another | एक निलंबित, दुसऱ्याची बदली

एक निलंबित, दुसऱ्याची बदली

सिंधुदुर्गनगरी : विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फणसगाव चेकनाक्यावरील पोलीस कर्मचारी एका वाहनधारकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ पाहून सखोल चौकशीअंती पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण याची भूमिका संशयास्पद असल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. तर त्याचवेळी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस नाईक सुनील पवार यांच्यावर बदलीची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. फणसगाव चेकनाक्यावर पोलीस कर्मचारी एका व्यक्तीकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांना पाठविण्यात आले होते.
या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांची नेमणूक केली होती. (पान १ वरून) त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ३ एप्रिलला पोलीस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल सादर केला होता. तर पोलीस अधीक्षकांनी संबंधित दोघांना बोलावून घेऊन त्यांची चौकशी केली होती.
प्राप्त झालेले व्हिडीओ चित्रीकरण आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या अहवालानुसार पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण याची संशयास्पद वागणूक दिसून आली. या प्रकरणी चव्हाण याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी निलंबित केले, तर त्याच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी सुनील पवार यांच्याकडून कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बदलीची कारवाई केली.
याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर म्हणाले की, ज्या पत्रकाराने जागरुकता दाखवून या घटनेचे चित्रीकरण केले त्याचे मी अभिनंदन करतो. चुकीच्या कामांना आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रदीप चव्हाण याची खातेनिहाय चौकशी करण्यात येणारएक निलंबित, दुसऱ्याची बदली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)

‘लोकमत’मध्ये प्रथम वृत्त
‘पैसे घेताना दोघा पोलिसांचे चित्रीकरण’ असे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि. ५ एप्रिल) सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

Web Title: One suspended, one for another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.