शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाशी अपघातात एकजण ठार, नांदगाव मुस्लिमवाडीवर शोककळा : दोन वाहनांमध्ये झाली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:34 IST

नेरुळ (वाशी) येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात नांदगाव मुस्लिमवाडी येथील टेम्पोचालक रमजान नावलेकर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान घडला.

तळेरे : नेरुळ (वाशी) येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात नांदगाव मुस्लिमवाडी येथील टेम्पोचालक रमजान नावलेकर (४५) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान घडला.नांदगाव मुस्लिमवाडी येथील रमजान अब्दुल नावलेकर हे आपल्या ताब्यातील टेम्पो (एम. एच. ०७, पी. ०४२८) घेऊन नेहमीप्रमाणे भाडे घेऊन मुंबई वाशी येथे गेले होते. मंगळवारी पहाटे ते गावी येण्यासाठी निघाले असता नेरुळ येथे पुढे असलेल्या डंपरला त्यांच्या टेम्पोची धडक बसली. ही धडक एवढी भयंकर होती की, रमजान यांचा जागीच मृत्यू झाला.

वटपौर्णिमेसाठी मुंबईत फणस घेऊन जात असताना देवेंद्र आणि जयवंत बिडये यांच्या अपघाती निधनाची घटना ताजी असतानाच या आणखी एका दुर्दैवी घटनेची माहिती समजताच नांदगावावर शोककळा पसरली. नांदगाव येथील रमजान यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने ताबडतोब मुंबईला धाव घेतली.रमजान यांचा नांदगाव व तळेरे परिसरात मोठा मित्र परिवार आहे. रमजान सुरुवातीला सहाआसनी रिक्षा व्यवसाय करायचे. तसेच नांदगाव परिसरात वेळप्रसंगी ते नेहमीच मदतीसाठी पुढे असायचे. या अपघाताचे वृत्त समजताच नावलेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. रमजान यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग