शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भरधाव कारने पादचाऱ्याला उडविले, एक जण गंभीर जखमी; खारेपाटण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 13:26 IST

खारेपाटण(कणकवली) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजी नगर येथे आज, बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई वरून आलेल्या व  गोव्याच्या दिशेने ...

खारेपाटण(कणकवली) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण संभाजी नगर येथे आज, बुधवारी सकाळी ८.४५ वाजता मुंबई वरून आलेल्या व  गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव  कारने (क्रमांक एम. एच. १२-एल. पी. ९३९५) रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्थानिक पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. यात हा पादचारी गंभीर जखमी झाला. विठ्ठल रामचंद्र गुरव (वय ५८, खारेपाटण, गुरववाडी -संभाजी नगर) असे त्यांचे नाव आहे. या अपघातानंतर कार चालक पसार झाला.अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव तसेच संभाजी नगर खारेपाटण येथील युवकांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघातग्रस्त जखमीला पुढील उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. जखमी गुरव यांच्या डावा हात आणि पाय फॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर कार चालक कारसह तिथून पसार झाला. यानंतर मुंबई-गोवा महामार्ग नडगिवे येथे संबधित इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला सोडून तेथून दुसऱ्या गाडीने पसार झाला. खारेपाटण चेक पोस्टचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच अपघातग्रस्त इनोव्हा गाडी पंचनामा करून ताब्यात घेतली. अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे आणि पराग मोहिते करीत आहेत. खारेपाटण येथे संभाजी नगर जवळील मधूबन हॉटेल येथे ब्रिजपासून अगदी जवळच हा  अपघात झाला. येथे असलेले धोकादायक वळण तसेच महामार्गाला थेट जोडला गेलेला कोल्हापूर राज्यमार्ग हे त्याला कारणीभूत असून सध्या या ब्रिजचे काम सुरू असून जुन्या पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अजूनही इथे अपघात होण्याची शक्यता आहे.      

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातPoliceपोलिस