पर्यटन विकासासाठी एक कोटी
By Admin | Updated: July 3, 2015 01:45 IST2015-07-03T01:41:48+5:302015-07-03T01:45:18+5:30
वैभव नाईक : तारकर्ली-देवबाग रस्ता डांबरीकरण होणार

पर्यटन विकासासाठी एक कोटी
मालवण : पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मालवण व कुडाळ तालुक्यातील १ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली. यात तारकर्ली, देवबाग येथील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम मंजूर झाल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. तसेच कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. तारकर्ली, देवबाग गावात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, पर्यटन ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. शिवाय अरुंद रस्त्यांमुळे पर्यटकांच्या वाहनांना समस्या भासत होती. तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आमदार वैभव नाईक यांचेही याकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानुसार पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मालवण व कुडाळ तालुक्यातील विकासकामांसाठी नाईक यांनी पाठपुरावा केला होता. तारकर्ली, देवबाग येथील रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामासाठी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. (वार्ताहर)