शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहीम; उपवनसंरक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश 

By अनंत खं.जाधव | Updated: May 16, 2024 19:17 IST

सिंधुदुर्ग वनविभागाचे पथक करतय दांडेली अभयारण्यात हत्तीचा अभ्यास 

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीचा वाढता उपद्रव लक्षात घेता त्यावर उपाय योजना करण्यासाठी शासन पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहीम राबविण्याच्या विचारात असून त्यासाठी सिंधुदुर्ग वनविभागाचे एक पथक उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यात अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. हे पथक गेले दोन दिवस दांडेली जंगलातील हत्तीचा अभ्यास करत आहेत.

सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील काहि भागात हत्तीचा मोठ्याप्रमाणात उपद्रव सुरू आहे.हे हत्ती शेती बागायतीचे नुकसान करत आहेत त्याशिवाय माणसावर हल्ले ही करत  आहेत.त्यामुळे या सर्वाचा रोष हा वनविभागावर निघत आहे. वनअधिकारी कर्मचारी ग्रामस्थांच्या या रोषाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी वेगवेगळया अभ्यास सुरू केला आहे.या हत्तीना आल्या मार्गाने कर्नाटक राज्यात पाठावायचे झाले तर काय करता येईल याचा अभ्यास सध्या सुरू आहे. तसेच हत्ती हटाव शक्य नसल्यास हत्तींना एकाच जागेवर थांबवून ठेवायचे झाले तर काय करता येईल याचाही अभ्यास सध्या सुरू आहे.

मध्यंतरी आसाम येथील काहि तज्ञ मंडळींही सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन अभ्यास करून गेले होते.त्यानी अपला अहवाल शासनाला सादर केला आहे.त्यानंतर आता पुन्हा एकदा शासनाने दांडेली अभयारण्यात जाऊन तेथील हत्तीचा अभ्यास करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक अभ्यास पथक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शना खाली दांडेली येथे पाठविण्यात आले असून या पथकात सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्यासह काहि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.हे अभ्यास पथक गेले दोन दिवस दांडेली येथे अभ्यास करत आहे. हे पथक आपल्या अभ्यास दौऱ्याचा अहवाल शासनाला देणार असून त्यानंतर पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे. नऊ वर्षांपूर्वी राबविण्यात आली होती मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ वर्षांपूर्वी हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली होती.ही मोहीम काही अंशी यशस्वी ही झाली होती.पण काहि कालावधीनंतर पुन्हा एकदा कर्नाटक मधून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.ते आजही कायम आहेत त्यावर उपाय योजना करण्यासाठी सिंधुदुर्ग वनविभाग प्रयत्न शील आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी