शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

महायुतीच्यावतीने कणकवलीत ५ ऑक्टोबरला आरक्षण बचाव रॅली, नितेश राणेंनी दिली माहिती

By सुधीर राणे | Updated: September 26, 2024 17:08 IST

'राहुल गांधींच्या प्रवृत्ती आणि विचाराला विरोध करणार'

कणकवली : देशाचे विरोधी पक्ष नेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमात काँग्रेसची सत्ता आली तर भारतामध्ये जी आरक्षण व्यवस्था आहे, ती संपवून टाकू, असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या प्रवृत्तीचा आणि विचाराचा आम्ही विरोध करणार आहोत. त्यामुळे कणकवली येथे भाजपा, शिंदेसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीच्या पक्षांच्यावतीने ५ ऑक्टोबरला आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अजितकुमार कदम, भाजप अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, किरण जाधव, भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार  जो आरक्षणाचा हक्क दिलेला होता, तो संपूर्ण संपुष्टात आणण्याचे काम राहुल गांधींनी केलेले आहे. वर्षानुवर्षे आमचा हा समाज या हक्काने वावरतो आहे. शिक्षण, नोकरी आणि विविध स्तरांमध्ये त्यांना जो अधिकार मिळतो आहे, तो काढून घेण्याचे आणि आरक्षण संपवण्याचे काम राहुल गांधींच्या काँग्रेसच्या माध्यमातून होताना दिसत आहे. त्यामुळे जेव्हा असा प्रयत्न होईल, तेव्हा त्याला तीव्र विरोध केला जाईल.आरक्षण हा आमचा हक्क आहे. आणि या हक्कासाठी येणाऱ्या ५ ऑक्टोबरला कणकवली येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय व महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून आरक्षण बचाव रॅली काढण्यात येईल. सकाळी १० वाजता जानवली पूल येथून रॅलीला प्रारंभ होईल. तेथून शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या येथे रॅली पोहचल्यावर तिथे अभिवादन केले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे सर्व एकत्र जमू. आमचे एक शिष्टमंडळ कणकवली प्रांताधिका-यांना निवेदन देईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे reservationआरक्षणRahul Gandhiराहुल गांधी