शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 14:33 IST

सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार

कणकवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुखपदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    उपजिल्हाप्रमुखपदी महिंद्र सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांना नियुक्ती दिली असून सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सिंधूरत्न योजना समिती सदस्य किरण सामंत, माजी खासदार सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.या निमित्ताने कणकवली येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नूतन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत- पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.संजय आग्रे यांच्याकडे कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण या पाच तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मालवण- कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख (कणकवली, देवगड, वैभववाडी) संदेश सावंत -पटेल, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,शेखर राणे, विश्राम रावराणे यांची नावे जाहीर करण्यात आली.कुडाळ तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, कणकवली - (जानवली. फोंडा, हरकुळ, कलमठ, कळसुली, नाटळ,कणकवली शहर) भुषण परुळेकर ,(कासार्डे, खारेपाटण ) शरद वायंगणकर.देवगड -(शिरगाव, फणसगाव पोंभूर्ले किंजवडे, देवगड शहर ) -विलास साळसकर, (मिठबाव, पडेल. पुरळ, जामसांडे शहर)-अमोल लोकेमालवण - (आचरा, आडवली, मसुरे, सुकळवाड)- महेश राणे, (देवबाग, कट्टा, पेंडुर, मालवण शहर)- विश्वास गावकर, वैभववाडी :संभाजी रावराणे, कणकवली तालुका समन्वयक- सुनिल पारकर  यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गEknath Shindeएकनाथ शिंदे