कळंबणी गावात वृद्धाचा खून

By Admin | Updated: January 31, 2016 01:15 IST2016-01-31T01:15:09+5:302016-01-31T01:15:09+5:30

कोयत्याने प्रहार

Older blood in Kambani village | कळंबणी गावात वृद्धाचा खून

कळंबणी गावात वृद्धाचा खून


खेड : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावडेवाडी येथील तुकाराम सखाराम गावडे (वय ७२) या वृद्धाचा धारदार हत्याराने अमानुष खून करण्यात आला. शनिवारी पहाटे गावडे यांचा मृतदेह आढळल्याने हा खून उघडकीस आला.
तुकाराम गावडे हे रानात जळावू लाकडे तोडण्यासाठी जात असत़ २९ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जळणाकरिता लाकडे तोडण्यासाठी गेले होते़ ते परत आलेच नाहीत. यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली; मात्र गावात तसेच शेजारील गावात त्यांचा शोध लागला नाही. यामुळे त्यांचा मुलगा राजाराम गावडे यांनी ते गेलेल्या गावातीलच बलदेव धरणाकडील भागात रात्रभर शोधाशोध केली. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता तुकाराम गावडे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मानेवर धारदार हत्याराने किंवा कोयत्याने प्रहार झाला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या मानेच्या मागील बाजूस हे वार करण्यात आले आहेत.
आपल्या पित्याचा खून करण्यात आला असल्याची तक्रार राजाराम गावडे यांनी लागलीच खेड पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३0२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Older blood in Kambani village