सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी ४१.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली असून काही मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.तालुकानिहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग १३ (१८८२), सावंतवाडी ४८ (१४५१), वेंगुर्ले ३६.४ (२१५३.२४), कुडाळ ३० (१६७१), मालवण ४० (१५१७), कणकवली ४७ (१९७२), देवगड ७९ (१४३६), वैभववाडी ३८ (१९७१) असा पाऊस झाला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात उशिराने दाखल झालेल्या पावसाने हळूहळू आपली सरासरी गाठण्यापर्यंत मजल मारली आहे.तिलारी परिसरात २000 मिलीमीटरची सरासरी गाठलीतिलारी आंतरराज्य प्रकल्प ७९.३३ टक्के भरला असून या धरणामधून २२.५१ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणामध्ये ३५४.८८७0 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात ७५.४0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून २00७.४0 मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे.१४ लघुपाटबंधारे प्रकल्प १00 टक्के भरलेकणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ५८.९१ टक्के भरला आहे. या प्रकल्पातून सध्या ८.२३ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी घळभरणी झालेला अरुणा मध्यम प्रकल्प ४६.0५ टक्के इतका भरला आहे. जिल्ह्यातील १४ लघु पाटबंधारे प्रकल्प १00 टक्के भरले असून तिथवली, सनमटेंब, ओटव, तरंदळे, वाफोली, धामापूर हे लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत.
पावसाची संततधार कायम, तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:06 IST
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी ४१.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७५६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे १०० टक्के भरली असून काही मोठ्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पावसाची संततधार कायम, तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू
ठळक मुद्दे पावसाची संततधार कायम, तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूसिंधुदुर्ग जिल्ह्यात आजमितीपर्यंत १७५६ मिलीमीटर पाऊस