शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाशिवरात्री निमित्त 'कनक रायडर्स' शिवशँभोचरणी लीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:56 IST

Mahashivratri Cycling sindhuddurg- महाशिवरात्रीनिमित्त कणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली.

ठळक मुद्देमहाशिवरात्री निमित्त 'कनक रायडर्स' शिवशँभोचरणी लीन ! १०४ किलोमीटरचा नाईट सायकल रायडिंगचा अनोखा उपक्रम

कणकवली : महाशिवरात्रीनिमित्तकणकवली शहरातील 'कनक रायडर्स ' च्या सायकलपटूंनी १०४ किलोमीटर नाईट सायकल रायडिंग करून अनोख्या पद्धतीने शिवशंभोचरणी आपली श्रद्धा अर्पण केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक सायकल रायडिंग कार्यक्रमात कणकवली शहरातील 'कनक रायडर्स 'चे सायकलपटू सहभागी असतात. महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी वेगळे करण्याची कल्पना 'कनक रायडर्स' चे मकरंद वायगंणकर यांना सुचली. महाशिवरात्र म्हटले की श्री शंकराचे भक्त मंदिरात जाऊन श्री शंकराच्या चरणी लीन होतात.मकरंद वायंगणकर यांनी बुधवारी रात्री ८ वाजता आपल्या 'कनक रायडर्स'च्या व्हाट्सअप ग्रुपवर महाशिवरात्रीनिमित्त रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत सरप्राईज नाईट सायकल राईड करायची भन्नाट कल्पना मांडली. या नाईट सायकल रायडिंग चा थ्रिल अनुभवण्यासाठी 'कनक रायडर्स' चे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे आणि एस.एम.हायस्कुलचा नववीतील विद्यार्थी नितांत चव्हाण हे लागलीच तयार झाले.

कणकवलीहून बुधवारी रात्री १० वाजता ते निघून महामार्गावरील ओरोस, कुडाळ, झाराप बायपासमार्गे मळगाव आणि परत कणकवली असा १०४ किलोमीटरचा प्रवास गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांनी पूर्ण केला. 'सायकलिंग करा, फिट राहा 'असा संदेश देत 'कनक रायडर्स'च्या सायकलपटूंनी केलेल्या नाईट सायकल रायडिंगबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गCyclingसायकलिंग