शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील तरुणाईला आता दीपोत्सवाचे वेध, जय्यत तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:47 IST

गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर ओसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना आता दिपोत्सवाचे वेध लागले आहेत. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली असून विविध रंगांचे आकाश कंदील बनविण्याबरोबरच दिवाळीच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सध्या सुरु आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गातील तरुणाईला आता दीपोत्सवाचे वेधजय्यत तयारी सुरु

सुधीर राणे कणकवली : गणेशोत्सवानंतर साजरा झालेल्या नवरात्रोत्सवाचा बहर ओसरल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लहान थोर व्यक्तिना आता दिपोत्सवाचे वेध लागले आहेत. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली असून विविध रंगांचे आकाश कंदील बनविण्याबरोबरच दिवाळीच्या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सध्या सुरु आहे.आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी , नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा असे चार दिवस साधारणतः दिवाळी साजरी केली जाते. काहीजण त्रयोदशी दिवाळीत न धरता उरलेल्या तिन दिवसांची दिवाळी असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात .म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः ते सण वेगवेगळे आहेत.असे काही जणांचे म्हणणे आहे.दीवाळी मध्ये दिप म्हणजेच दिव्याना जास्त महत्व असते. त्यामुळे दिवाळीला दीपोत्सव असेही म्हटले जाते. या दिपोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. बाजारपेठेमध्ये विविध रंगाचे तसेच विविध ढंगाचे आकाश कंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. काही ठिकाणी घरांबरोबरच दुकानाना रंग काढण्यात येत आहे. बाजारपेठेत मातीच्या पणत्या ,रांगोळी , विजेवर चालणारी तोरणेही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.अनेक ठिकाणी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु आहे. अलीकडे फराळ घरी बनविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तयार फराळाला बाजारपेठेत जास्त मागणी असते. महिला बचत गटानी तयार फराळाच्या ऑर्डर स्विकारुन फराळ बनविला आहे.दिवाळीच्या निमित्ताने सगळीकडे जरी उत्साहाचे वातावरण असले तरी वाढत्या महागाईमुळे खर्चाचा मेळ बसवीताना गृहिणीना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या उत्साहावर काहीसे विरजण पड़त आहे.शहरी भागात दिवाळीच्या निमित्ताने काहीसा उत्साह दिसत असला तरी ग्रामीण भागात भात कापणी सुरु असल्याने शेतकरी त्यात गुंतले आहेत. नरकासुर स्पर्धेची तयारी काही तरुणांकडून केली जात आहे.काही तरुणानी नरकासुर बनवून तयार ठेवले आहेत. त्याची रंगरंगोटी सुरु आहे.शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी असल्याने या सुट्टीचा वापर करीत त्यांच्याकडून अनेक 'फंडे ' केले जात आहेत. दीवाळी अंक, फराळ, नवीन कपड़े तसेच अन्य वस्तुंची खरेदी याविषयीही चर्चा सर्वत्र सध्या रंगत आहेत. विविध कंपन्यानी दुचाकी तसेच चार चाकी वाहनांवर ग्राहकाना आकर्षक सूट जाहिर केली आहे. त्यामुळे सर्वानाच दिपोत्सवाचे वेध लागल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :Diwaliदिवाळीsindhudurgसिंधुदुर्ग