आता कैद्यांचीही होणार आधारकार्ड नोंदणी
By Admin | Updated: July 28, 2014 23:16 IST2014-07-28T22:01:34+5:302014-07-28T23:16:53+5:30
शासन निर्देशानुसार

आता कैद्यांचीही होणार आधारकार्ड नोंदणी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील कारागृहामध्ये असलेल्या कैद्यांचेही आधारकार्ड शासनाच्या निर्देशानुसार काढण्याच्या प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३0 हजार एवढ्या नागरीकांची कार्ड काढून झालेली असून शिल्लक राहिलेल्या नागरिकांनी जिल्हा बँकेच्या ३६ शाळांमधून सुरू असलेल्या आधारकार्ड नोंदणी केंद्रामध्ये आपली आधारकार्ड नोंदणी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड केले आहे.केंद्र शासनाच्या निर्णयानुसार सर्वांना एकच ओळखपत्र यानुसार देशभर आधारकार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू असून सिंधुुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ३0 हजार म्हणजेच ७३ टक्के नागरिकांची आधारकार्ड, नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता शासन निर्देशानुसार कैद्यांचीही आधारकार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कारागृह असून यामध्ये ३६ पुरूष कैदी व २ महिला कैदी असे एकूण ३८ कैदी आहेत. या सर्वांची नोंदणी जिल्हा बँकेच्या आधारकार्ड नोंदणीमार्फत करण्यात येणार आहे. नोंदणी करून घेण्याचे आवाहन खुटवड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)