शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्लेत नोव्हेंबर महिन्यातच कलमांच्या आंबा झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:23 IST

 आंबा बागायतीस पूरक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत देशी गायीच्या मल व मूत्रापासून बनविलेल्या जीवामृताचा नियमित डोस दिल्याने वेंगुर्ले भटवाडी येथील आंबा बागेतील झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. अलीकडेच शून्य खर्च नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी या फार्म हाऊसला भेट देऊन प्रशंसा केली होती. 

ठळक मुद्देवेंगुर्लेत आंबा बागायतीस जीवामृताचा डोसशून्य खर्च नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंबवेंगुर्लेत संशोधन, नोव्हेंबर महिन्यातच कलमांच्या झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर

वेंगुर्ले ,दि. ०४ :  आंबा बागायतीस पूरक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत देशी गायीच्या मल व मूत्रापासून बनविलेल्या जीवामृताचा नियमित डोस दिल्याने वेंगुर्ले भटवाडी येथील आंबा बागेतील झाडास मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे.

आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात थंडी मोठ्या प्रमाणात पडते. त्यामुळे हे वातावरण आंबा झाडास मोहोर येण्यास उपयुक्त असते. पण अलीकडे वातावरणात थंडपणा नसल्याने थंडीचा जोर कमी आहे. हे वातावरण आंबा पिकास पोषक नसताना वेंगुर्ले-भटवाडी येथील अँस्ट्रेक फार्महाऊसवर मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, ऊस, केळी, हळद, काळी मिरी तसेच पूरक आंतरपिके घेतली जातात.

या फार्म हाऊसवर देशी गायींची पैदास केलेली असून त्यांच्या मल व मूत्रापासून जीवामृताची निर्मिती करून सर्वच झाडांना अशा जीवामृताचा दर दहा ते पंधरा दिवसांनी झाडाच्या वयोमानानुसार दहा लीटरचा डोस दिला जातो. आंबा झाडांना पोषक वातावरण नसतानाही शून्य खर्च नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे.शून्य खर्च नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंबयेथील व्यवस्थापक सुशांत खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तज्ज्ञ डॉक्टर व त्यांची टीम शून्य खर्च नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करीत आहे. त्यामुळे त्यांना सकारात्मक निकाल मिळत आहे. अलीकडेच शून्य खर्च नैसर्गिक शेतीचे जनक पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी या फार्म हाऊसला भेट देऊन प्रशंसा केली होती.  

टॅग्स :konkanकोकणagricultureशेती