सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अवैध होर्डींग्ज कारवाई बाबत सूचना जारी
By Admin | Updated: April 22, 2017 13:27 IST2017-04-22T13:27:52+5:302017-04-22T13:27:52+5:30
जिल्हाधिकारी व पोलीस विभागयांना मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या अवैध होर्डींग्ज कारवाई बाबत सूचना जारी
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : उच्च न्यायालयाने अवैध होर्डींग्ज, जाहिराती, बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर्स जाहिरातीबाबत दाखल जनहित याचिकांवर निर्णय देताना सर्व संबंधित विभाग उदा. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी व पोलीस विभागयांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
या बाबत सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ४१६८१२, फोन नं. ०२३६२-२२८२०३ असे पोलीस अधीक्षक येथे त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अमोघ गावकर यांनी केले आहे.