शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षात काही केले नाही, आता काय करणार; राजन तेलींचे दीपक केसरकरांवर टीकास्त्र 

By अनंत खं.जाधव | Updated: October 23, 2024 12:09 IST

'केसरकरांना कायमचे गुडबाय करून जर्मनीला पाठवूया'

सावंतवाडी : निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवते. विकास झाला नाही तो कळतो. त्यामुळेच आता येथील जनतेने सावध झाले पाहिजे आणि यांना कायमचे गुडबाय करून जर्मनीला पाठवूया २३ नोव्हेंबर रात्रीचे तिकिट काढूनच ठेवले आहे अशी जोरदार टीका उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा रियाज खान उपस्थित होते.तेली म्हणाले, केसरकर यांनी मागील पंधरा वर्षात मतदार संघात कोणतेच विकास काम केले नाही. त्यामुळे त्यांना आज अनेक विकासकामे अपुरी आहेत याची आठवण होते. त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा संधी द्या असे येथील जनतेला आवाहन करत आहेत. पण आता जनतेने ओळखले पाहिजे. हे पुन्हा संधी मागतात पण विकास कामे करत नाही त्यामुळेच जनतेने बदल करावा आणि आमदार नवीन हवा असे सांगितले.तेव्हा त्यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवली नाही? २००९ मध्ये केसरकर यांच्या निवडणुकीत ही काम केलं तेव्हा त्यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवली नाही का? असा सवाल केला. ते जी टीका करत आहेत त्याला येथील जनता भीक घालणार नाही. आता जनतेला सर्व काही कळले आहे. केसरकर फक्त आश्वासन देतात प्रत्यक्षात कोणतेच विकास काम करत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणखात्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोपी तेली यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीRajan Teliराजन तेली Deepak Kesarkarदीपक केसरकर