शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे : शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:09 IST

शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जादूटोणा करतात. त्यांच्याकडून बंगाली जादुचे प्रयोग केले जातात असा आरोप त्यांचेच सहकारी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सहकारी सुर्यकांत दळवी यांनीही तसाच आरोप मंत्री कदमांवर केलेला आहे.

हे दोन्ही आरोप करणाऱ्या व्यक्ती दोन्ही मंत्र्यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले हे आरोप नसून सत्यच आहे . असे म्हणावे लागेल. असे सांगतानाच शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, दीपक केसरकरांबाबत आम्ही अनेक गोष्टी ऐकून होतो. परंतु , बबन साळगावकर हे केसरकरांच्या गाडीतून फिरणारे एक प्रमुख व्यक्ती आहेत. तसेच बबन साळगावकर यांच्याकडे एक डायरी देखील आहे. त्या डायरीत अनेक उल्लेख असल्याचे ते सांगतात.जर बंगाली जादुचे प्रयोग करुन दीपक केसरकर आणि रामदास कदम निवडणुका जिंकत असतील तर ही बाब लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे जनतेने तरी लोकशाहीवर विश्वास ठेवावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने या आरोपांमुळे केसरकर यांच्या बौद्धीक विचारांचे हे अपयशच असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी टीका राणे यांनी केली .

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग