शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने हरकती नोंदविणार ; सीआरझेड नकाशात उल्लेख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:32 IST

मालवण : केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने १८ जानेवारी २०१९ रोजी जारी केलेल्या सीआरझेड अधिसूचनेंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या किनारा ...

ठळक मुद्दे तारकर्लीत पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय

मालवण : केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने १८ जानेवारी २०१९ रोजी जारी केलेल्या सीआरझेड अधिसूचनेंतर्गत प्रसारित करण्यात आलेल्या किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यात किनारपट्टीवर वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्या कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने या आराखड्यावर हरकत नोंदविण्याचा निर्णय वायरी-तारकर्ली येथे झालेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.

तारकर्ली येथील टीटीडीएस पर्यटन व्यावसायिकांची सीआरझेड व्यवस्थापन आराखड्याविषयी विशेष सभा वायरी येथील हॉटेल किनारा येथे झाली. या बैठकीस बाबा मोंंडकर, दिलीप घारे, महेंद्र पराडकर, संजय खराडे, राजन कुमठेकर, मिलिंद झाड, सहदेव साळगावकर, श्याम झाड, देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, नमिता गावकर, अन्य नागरिक व पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

यावेळी मालवणमधील वायरी, देवबाग व तारकर्ली या तिन्ही ग्रामपंचायतींना भेट देऊन यासंदर्भात सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. तसेच तालुक्यातील किनारपट्टीवरील प्रत्येक घर एक हरकत अभियान राबविण्यासंदर्भात नियोजन करण्याचे ठरले. किनारपट्टीवर प्रारुप आराखडा व हरकतींविषयी जनजागृती करण्याचे ठरले. ज्याची माहिती ग्रामस्थांना नाही. वर्षानुवर्षे किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या मच्छिमार रहिवाशांचे व पर्यटन व्यावसायिकांचे हक्क अबाधित राहिलेच पाहिजेत. सीआरझेड क्षेत्रातील मच्छिमार वसाहतींचे क्षेत्र, पर्यटन व्यावसायिकांचे प्रारुप आराखड्यांमध्ये समाविष्ट करून न्याय देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील मालवण, वेंगुर्ला, देवगड येथील नागरिकांनी या विषयी हरकत नोंदविणे गरजेचे आहे. अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर झाल्यास किनारपट्टीवरील नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे आपणही आपापल्या जवळपास असलेल्या समुद्र्रकिनाºयावरील सर्व घरे, होम-स्टे, रिसॉर्ट धारकांना, ग्रामपंचायतीना या आराखड्याबाबत गरजेनुसार किंवा कोळीवाडे व मच्छिमार वसाहती दर्शवावे याविषयी यासाठी हरकती घेण्यासाठी अवगत करावे. जेवढ्या जास्तीत जास्त हरकती शासनदरबारी नोंदविल्या जातील तेवढे चांगले होईल, असे आवाहन करण्यात आले. हरकत घेण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जरुरीनुसार अभ्यास करावा, असे आवाहन अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.हरकती, सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारीकिनारा क्षेत्र व्यवस्थापन प्रारुप आराखड्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत अंतिम मुदत आहे. दरम्यान, या बैठकीत प्रारुप आराखड्यावर कशाप्रकारे हरकती नोंदवायच्या यासंदर्भात चर्चा करण्यात आली. प्रारुप आराखड्यामध्ये कोळीवाडे किंवा मच्छिमार वसाहतीचा, रापण संघ यांच्या वापरातील जागा, कावने, मासे सुकविणे यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मुद्यावर सर्वप्रथम हरकत नोंदविण्याचे ठरले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण