शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जागतिक बालकामगार विरोधी दिन: बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा; कायदा असतानाही बालपण हरवतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:49 IST

जनजागृती करणे हाच मुख्य मार्ग, सिंधुदुर्गात आढळला नाही एकही बालकामगार

मनोज वारंगओरोस : ‘बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा..’ असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा.. पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो, तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते? कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार.. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही परिस्थिती नाही. सिंधुदुर्गात कोठेही बालकामगार आढळून येत नाही.१४ वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवतात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे, त्या वयात हातात झाडू घेऊन साफसफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे, अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवेल ती वस्तू विकत घेऊन देणारे हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठवणारे नाईलाज मायबाप... समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार...? हा समाजापुढे गहन प्रश्नच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र, बालकामगार नसल्याने जिल्ह्यासाठी ते देखील भूषणावह ठरले आहे. यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.तर २ वर्षे शिक्षा१४ वर्षांखालील बालकाला सर्वच व्यवसाय व प्रक्रियांमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक व्यवसाय व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी ६ महिने ते २ वर्षांपर्यंत वाढवता येईल इतक्या तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान २० हजार रुपये व कमाल ५० हजार रुपये इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा मालकाला होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान १ वर्ष ते ३ वर्षांपर्यंत वाढवता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

जनजागृती१२ जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता सातत्याने शासनाच्या विविध विभागांमार्फत व विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.बालकामगार म्हणजे काय ?१४ वर्षांखालील मुले स्वत:च्या किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जेव्हा कोणतेही काम करतात, तेव्हा त्यांना बालकामगार म्हणतात. हे काम त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक विकासासाठी, शिक्षणाच्या अधिकाराला आणि सन्मानाला धोका पोहोचवते.

बालकामगारांचे प्रकारऔद्योगिक बालकामगार : कारखाने, वीटभट्ट्या, वस्त्र उद्योग, शेती, फटाके, हाॅटेल व्यवसाय.घरगुती बालकामगार : श्रीमंत घरामध्ये मदतनीस, स्वयंपाक, साफसफाई, घरगुती कामे.बंधपत्रित बालकामगार : कर्ज फेडण्यासाठी मुलांना जबरदस्तीने कामावर लावणे.

बालकामगारी मागील कारणे

  • गरिबी
  • शिक्षणाचा अभाव
  • कौटुंबिक परिस्थिती
  • सामाजिक असमानता

दुष्परिणाम

  • शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम
  • शिक्षणात अडथळा
  • बालपण हिरावले जाणे
  • व्यसनाधिनता, आजारपण

सर्व औद्योगिक संघटना, असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, क्रिडाई बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, शासकीय,  निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करून या मोहिमेत सहभाग नोंदवावा. - अजिंक्य बवले, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग